दहेगाव येथे गोठा कोसळून चार गाई दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:36 IST2018-09-01T23:36:26+5:302018-09-01T23:36:41+5:30
तालुक्यातील दहेगाव(माईन्स) येथे गोठा कोसळून चार गायीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

दहेगाव येथे गोठा कोसळून चार गाई दगावल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यातील दहेगाव(माईन्स) येथे गोठा कोसळून चार गायीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
लाखांदूर तालुक्यात सततधार पावसाने थैमान घातले होते. यात अनेक घरांची पडझड झाली. तर गावातील एक गोठा खिळखिळा झाला होता. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोठा कोसळून तीन गायी व एक वासरू असे ४ जनावरांचा जागीच ठार झाले. गोठ्यातील संपूर्ण जनावरे मातीच्या ढिगारात दबले गेले. बाबूराव डोंगरवार यांच्या दोन तर ललित तुलाराम डोंगरावर यांच्या दोन गाई मृत्यूमुखी पडल्या असून त्यांचे ६० ते ७० हजाराचे नुकसान झाले आहे. हा प्रकार माहित होताच अनेकांनी घटना स्थळी धाव घेतली. गार्इंना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान तलाठ्याने पंचनामा केला असून सदर शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे. यावेळी सरपंच राकेश झोडे व गावकरी उपस्थित होते.