लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गजबजलेल्या मिस्कीन टैंक परिसरात भर रस्त्यावर दोघांचा रॉड, चाकू आणि कुन्हाडीसारख्या शस्त्राचे घाव घालून खून केल्याची घटना शनिवारी रात्री ९:३५च्या दरम्यान घडली. मृतांमध्ये टिंकू ऊर्फ वसीम फारूख खान (३६, सौदागर मोहल्ला) आणि शशांक मनोहर गजभिये (२५, गणेशपूर, भंडारा) या दोघांचा समावेश आहे. या घटनेनंतर अवघ्या सहा तासांत पोलिसांनी रात्र जागून नागपूर आणि भंडारा शहरात दडून बसलेल्या चारही हल्लेखोरांना पहाटे ताब्यात घेतले.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये साहील साकीर शेख आणि फैजान साकीर शेख या दोघा भावंडांसह प्रीतम विलास मेश्राम (नांदोरा टोली, ता. भंडारा) आणि आयुष मुन्ना दहीवले (पेट्रोल पंप, ठाणा) यांचा समावेश आहे.
चार दिवसांपूर्वी कबाडीतून खरेदी केली होती कारया गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच ०३ / झेड २९०१ क्रमांकाची कार चार दिवसांपूर्वी कबाडीतून खरेदी केलेली आहे. ती साहिलने नेमकी कोणत्या कबाडीवाल्याकडून खरेदी केली, याचा शोध पोलिस घेत आहेत. टिंकूचा गेम करण्यासाठीच ही तयारी झाली असावी, एवढेच नाही तर पाळत ठेवून शनिवारी रात्री त्याचा गेम झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
असा आहे घटनाक्रम
- टिंकू खान याचे मिस्कीन टैंक परिसरात नगर परिषदेच्या व्यावसायिक स्टॉलमधील ५९ क्रमांकाच्या गाळ्यात दुकान आहे. तो दुकानात बसला असताना दोन हल्लेखोर दुचाकीवरून आले, त्यांनी टिंकूला दुकानाबाहेर काढून भर रस्त्यावर आणले व शस्त्रांनी वार सुरू केले. त्यानंतर पुन्हा दोन आरोपी एमएच ०३-झेड २९०१ क्रमांकाच्या कारमधून आले. त्यांनीही त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला चढविला.
- यात तो रक्तबंबाळ होऊन घटनास्थळीच निपचित पडला. हे बघून त्याचा मित्र शशांक गजभिये हा लोखंडी पाईप घेऊन वाचविण्यासाठी धावला. मात्र, हल्लेखोरांनी हल्ला करून त्यालाही लोळविले. अत्यंत निर्दयीपणे दोघांवरही घाव घातले. ते निपचित पडल्यानंतर चौघेही घटना स्थळावरून पसार झाले. ही घटना अवघ्या चार मिनीटात घडली.
- तपासासाठी पोलिसांची होती आठ पथके हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी प्रभारी पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथके तयार करण्यात आली होती.