चार आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:17 IST2017-11-26T00:17:21+5:302017-11-26T00:17:33+5:30
साकोली वनविभागा अंतर्गत येणाºया सानगडी पश्चिम सहवनपरिक्षेत्रातील पापडा (खुर्द) शिवारात दोन दिवसापूर्वी शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या सहायाने एका चितळाची शिकार केली.

चार आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : साकोली वनविभागा अंतर्गत येणाºया सानगडी पश्चिम सहवनपरिक्षेत्रातील पापडा (खुर्द) शिवारात दोन दिवसापूर्वी शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाहाच्या सहायाने एका चितळाची शिकार केली. याप्रकरणी वनविभागाने चार शिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून चितळाचे मुंडके, पाय, शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य अजूनपर्यंत हस्तगत करण्यात आले नाही.
राजकुमार रामा लांजेवार, राजु कारू सिडाम, रतीराम बळीराम ईस्कापे व बळीराम ऋषी सयाम चौघेही रा.पापडा (खुर्द) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पापडा खुर्द शिवारात २३ नोव्हेंबरला शिकाऱ्यांनी विद्युत प्रवाह लावून एका चितळाची शिकार केली होती. शिकारीनंतर मृत चितळाचे मांस घटनास्थळावर कापत असल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी ताफ्यासह घटनास्थळावर पोहचले. वनअधिकारी येणार असल्याचा सुगावा लागताच शिकारी चितळाचे मुंडके व चार पाय घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून चितळाचे मांस सानगडी वनपिरक्षेत्रात आणले. त्यानंतर शवविच्छेदन करून संपूर्ण मांस जाळले. तीन दिवसानंतर वनविभागाला आरोपी सापडले. आरोपीच्या शोधासाठी साकोलीचे क्षेत्र सहायक धोटे, सानगडीचे क्षेत्र सहायक तांडेकर, वनरक्षक बोपचे, वनरक्षक घुगे, वनरक्षक ठोके वनरक्षक डोरले आदी सापळा रचून शिकाºयांना ताब्यात घेतले.
डोके व साहित्ये मिळाले नाही
वनविभागाला शिकारी सापडले असले तरी या शिकारीत वापरण्यात आलेले साहित्य, चितळाचे डोके व पाय अद्याप सापडले नाही.
शिकार प्रकरणाचा तपास सुरू असून आज चार आरोपी सापडले. त्यांची कसून चौकशी करणे सुरू आहे. या शिकारीत वापरलेली साहित्य लवकरच जप्त करण्यात येईल.
- आरती उके,
वनक्षेत्राधिकारी साकोली.