संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला
By Admin | Updated: June 7, 2014 23:45 IST2014-06-07T23:45:13+5:302014-06-07T23:45:13+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील खरबी (नाका) पुलाखाली एका ३0 वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. दिलीप कपूरचंद रहांगडाले (३३) रा.पिपरिया बालाघाट असे मृताचे नाव आहे.

संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला
खरबी शिवारातील घटना : अपघात की खून?
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावरील खरबी (नाका) पुलाखाली एका ३0 वर्षीय इसमाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. दिलीप कपूरचंद रहांगडाले (३३) रा.पिपरिया बालाघाट असे मृताचे नाव आहे.
दिलीप रहांगडाले हे बुटीबोरी येथे खासगी कंपनीत कामाला होते. दि.५ जून रोजी ते दुचाकी एमएच ३६/ ५९९२ ने बुटीबोरी येथून मोहाडीला सासरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान प्रवासात असताना दिलीपला त्यांच्या सासु पुष्पा पटले यांचा फोन आला असता खरबीजवळ असल्याचे सांगितले. बराच वेळ वाट पाहूनही जावई घरी न पोहोचल्यामुळे सासूने पुन्हा संपर्क साधला असता, फोन लागला नाही. दुसर्या दिवशी सकाळी जवाहरनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार पुष्पा पटले यांनी नोंदविली.
दरम्यान, खरबी (नाका) शिवारात एका गुरख्याला टोलाई मंदिरजवळील पुलाखाली चिखलात फसलेला मृतदेह दिसला. पालथा असलेल्या मृतदेह काट्या ठेवून दुचाकी अंगावर ठेवलेली होती. त्यामुळे हा अपघात की खून यावर संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी र्मग दाखल केला आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे उघडकीस येईल, असे तपास अधिकारी नाले, सहायक फौजदार बालपांडे यांनी सांगितले. (वार्ताहर)