माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदरांजली
By Admin | Updated: July 30, 2015 00:41 IST2015-07-30T00:41:20+5:302015-07-30T00:41:20+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना आदरांजली
भंडारा : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारला हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानिमित्त अनेक संघटनांनी शोक सभा घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
भंडारा नगरपालिका
भंडारा नगरपालिकेत नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक सूर्यकांत ईलमे, शम्मू शेख, मुख्याधिकारी रवींद्र देवतळे, उपाध्यक्ष कविता भोंगाडे यांच्यासह पालिकेतील कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते.
तुमसर नगरपालिका
तुमसर नगरपालिकेत नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या अध्यक्षतेत डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष सरोज भुरे, प्रमोद तितीरमारे, आशिष कुकडे, दिपक कठाने यांच्यासह पालिकेतील कर्मचारी व नगरसेवक उपस्थित होते.
एम.पब्लिक स्कूल,लाखनी
लाखनी : मानेगाव येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापिका संगिता नंदेश्वर, मंगला बर्वे, संगिता हटवार, राखी डडेमल, उर्मिला खंडारे, संजु उके, रेहपाडे, धरमशहारे आदी उपस्थित होते. संचालन हटवार तर आभार मंगला बर्वे यांनी मानले.
मनसे भंडारा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शहरअध्यक्ष शैलेश गजभिये यांच्या अध्यक्षतेत आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. नितीन वानखेडे, दिनेश बारापात्रे, अजु पटेल, सलीम शेख, लोकेश राऊत, भिमराव मेश्राम, रोहण शर्मा, सुमित शेंडे, सागर चव्हाण, सुमित मेश्राम, स्वप्नील सार्वे उपस्थित होते.
गांधी हायस्कूल, बांपेवाडा
बांपेवाडा : स्थानिक महात्मा गांधी हायस्कुल बांपेवाडा येथील प्रांगणात मुख्याध्यापक ए.बी. बारसागडे यांचे अध्यक्षतेखाली व सर्व शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ.कलाम यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन यांच्या जीवनपटाबद्दल माहिती देण्यात आली व नंतर मौन पाळून डॉ.कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
जि.प. शाळा विरली
विरली : येथील जिल्हा परिषद आदर्श वरिष्ठ प्राथमिक शाळेत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम पवनकर, ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, शाळेचे मुख्याध्यापक बी.डी. भगत, सहाय्यक शिक्षक पारधी, मस्के, वैद्य, कोचे, चिरवतकर, ब्राम्हणकर, वंजारी आदी शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.कलाम यांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकला.
अधिकारी महासंघ, भंडारा
भंडारा : अणुशक्ती व क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताच्या अग्निपंखांना स्वदेशीचे बळ देणारे, सात्वीक शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अधिकारी महासंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या महान नेतृत्वाच्या निधनामुळे केंद्र शासनाने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
जि. प. शाळा, माटोरा
भंडारा : कारधा केंद्रांतर्गत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा माटोरा येथे श्रद्धांजली कार्यक्रमाला डॉ. वाघचौरे, उपसरपंच हितेश सेलोकर, मुख्याध्यापक वाय.आर. बिरे, शिक्षक गजभिये उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्रास्ताविक वाय.आर. बिरे यांनी, आभार जी.एन. शेंडे तर संचालन ए.एम. भालेराव यांनी केले.
वैनगंगा विद्यालय, पवनी
पवनी : येथील कार्यक्रमाला मुख्याध्यापक अनिल राऊत, माधवी भुते, भाऊराव तलमले, पराग टेंभेकर यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन प्रदीप घाडगे यांनी केले.
गोविंद शाळा, पालांदूर
पालांदूर : येथील गोविंद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका भूमिका नवखरे, व्ही.रा. काटेखाये, मुरलीधर नंदूरकर, ह.मु. धकाते, किशोर खंडाईत, जयदेव मेश्राम, अश्विनी ढोबळे आदी उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क