माजी नगराध्यक्षांची कर्मचाऱ्याला मारहाण

By Admin | Updated: August 22, 2015 00:51 IST2015-08-22T00:51:59+5:302015-08-22T00:51:59+5:30

अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरुन झालेल्या वादात माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी आरोग्य विभागातील लिापिक किशोर दादाजी उपरीकर यांना मारहाण केली.

Former mayor's head assault | माजी नगराध्यक्षांची कर्मचाऱ्याला मारहाण

माजी नगराध्यक्षांची कर्मचाऱ्याला मारहाण

भंडारा : अतिक्रमण काढण्याच्या मुद्यावरुन झालेल्या वादात माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर यांनी आरोग्य विभागातील लिापिक किशोर दादाजी उपरीकर यांना मारहाण केली. ही घटना संताजी वॉर्डातील नगर पालिकेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात शुक्रवारला सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी भगवान बावनकर यांना अटक करावी, अशी मागणी करुन नगर पलिकेच्या कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा फटका काम न होता परतावे लागलेल्या नागरिकांना सहन करावा लागला.
किशोर उपरीकर हे नगरपालिकेच्या आरोग्य विभागात लिपिक आहेत. त्यांची दि.१९ आॅगस्टपासून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत ड्युटी लावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने काल गुरूवारला सहकारनगरातील मनोज बागडे यांच्या घरासमोरील अतिक्रमण काढत असताना वाद झाला.
यावर उपरीकर यांनी नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांना झालेल्या प्रकाराची माहिती दिली. अध्यक्षांच्या सुचनेनुसार कर्मचारी माघारी परतले. त्यानंतर नगर पालिकेच्या कार्यालयात उपरीकर पोहोचताच बावनकर यांनी उपरीकर यांना शिविगाळ करून पाहून घेण्याची धमकी दिल्याची उपरीकर यांची तक्रार आहे. दरम्यान आज शुक्रवारला सकाळी ७ वाजताच्या सुमारास उपरीकर हे आरोग्य विभागात कर्तव्यावर असताना माजी नगराध्यक्ष भगवान बावनकर तिथे आले. त्यांनी उपरीकर यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी तिथे उपस्थित हरिष मोगरे, सागर कटकवार, विरेंद्र पांडे, आनंद कटकवार या कर्मचाऱ्यांनी बावनकर यांना समजविण्याचा प्रयत्न केला, असे उपरीकर यांनी भंडारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
यासंदर्भात भंडारा शहर पोलिसांनी किशोर उपरिकर यांची तक्रार स्वीकारली असून तपासाअंतर्गत ठेवली आहे. वृत्त लिहीपर्यंत बावनकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. (प्रतिनिधी)

Web Title: Former mayor's head assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.