देवसर्ऱ्यात फलकाची औपचारिकताच
By Admin | Updated: November 9, 2014 22:29 IST2014-11-09T22:29:10+5:302014-11-09T22:29:10+5:30
देवसर्रा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात पांदण रस्त्याचे काम करण्यात आली आहेत. परंतु या कामाची माहिती दर्शविणारी फलक फक्त औपचारिकताच दाखवित असल्याने निधी खर्चात

देवसर्ऱ्यात फलकाची औपचारिकताच
चुल्हाड (सिहोरा) : देवसर्रा येथील ग्रामपंचायत अंतर्गत गावात पांदण रस्त्याचे काम करण्यात आली आहेत. परंतु या कामाची माहिती दर्शविणारी फलक फक्त औपचारिकताच दाखवित असल्याने निधी खर्चात आलबेल असल्याचा सूर गावात आहे.
तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दीड हजार लोकवस्तीच्या देवसर्रा गावात विकासाचा अनुशेष आहे. गावात अंतर्गत विकास झालेला नाही. राज्य मार्गावरून गावात प्रवेश करणारा खडीकरण रस्ता जागोजागी उखडला आहे. याच गावातील अन्य रस्तेही याच स्थितीत आहेत. सिमेंट रस्ते खड्डेमय झाली आहेत. गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना कामे उपलब्ध करण्यासाठी पांदण रस्त्याचे माती आणि मुरुम कामे करण्यात आली आहे. कुशल आणि अकुशल असे या कामाचे स्वरुप आहेत. या कामावर पंचायत समितीच्या रोहयो विभागाचे नियंत्रण आहणे. कुशल कामाचे देयक याच विभागामार्फत काढण्यात येत आहे. शाखा अभियंता यांच्या चौकशीनंतर अंतिम देयके वितरीत केली जात आहेत. कामाची माहिती निधी दर्शविणारे फलक लावणे, अनिवार्य करण्यात आले आहे. त्या प्रमाणे या ग्रामपंचायत अंतर्गत बपेरा रोड ते पवनलाल बिसने यांच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याचे आधी मातीकाम करण्यात आले आहे. नंतर याच पांदन रस्त्याचे कुशल कामावर मुरुम घालण्यात आलेला आहे. परंतु माहिती दर्शविणारा फलक कोरा (रिकामा) ठेवण्यात आलेला आहे. या पांदन रस्तयाच्या कामात तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मंजुरी, कार्यारंभ आदेश क्र. कामावर झालेला खर्च, कुशल आणि अकुशल काम सुरु झाल्याचा दि. तथा काम पूर्ण झाल्याचा दि. आदी रिकामे आहेत. परंतु या फलकावर मात्र सरपंच, उपसरपंच आणि सचिव यांची नावे लिहिण्यास विसरण्यात आले नाही. यावरून हा फलक फक्त औपचारिकताच दर्शवित आहे. दरम्यान पांदन रस्त्याची चौकशी करीत असताना शाखा अभियंता यांच्या ध्यानीमनी हे आले नाही. या कामाचे संपूर्ण देयकाची उचल करण्यात आली आहे. माहिती दर्शविणाऱ्या फलकात अत्यावश्यक खर्चाची माहिती दडविण्यात आल्याने संशय निर्माण झालेला आहे. (वार्ताहर)