वनक्षेत्राधिकारी, क्षेत्रसहायक निलंबित
By Admin | Updated: July 5, 2014 23:24 IST2014-07-05T23:24:05+5:302014-07-05T23:24:05+5:30
लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र लाखनी मौजा गोंडसावरी येथील संरक्षित वन कक्ष क्र. १०९ मधील सागवानाची २१ झाडे व बटे ६ झाडे कापून मालाची अफरातफर केल्याप्रकरणी क्षेत्र वनक्षेत्राधिकारी वैद्य व क्षेत्र

वनक्षेत्राधिकारी, क्षेत्रसहायक निलंबित
लाखनी : लाखनी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र लाखनी मौजा गोंडसावरी येथील संरक्षित वन कक्ष क्र. १०९ मधील सागवानाची २१ झाडे व बटे ६ झाडे कापून मालाची अफरातफर केल्याप्रकरणी क्षेत्र वनक्षेत्राधिकारी वैद्य व क्षेत्र सहाय्यक एस.आर. शेख यांच्याविरुद्ध शिस्तभंग कारवाई करून मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) नागपूर यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत.
रेंगेपार (कोठा) येथील शेतकरी तुळशीराम गोविंदा तितीरमारे गट क्र. ६१/२ यांच्या मालकीच्या शेतातील सागवान झाडाची कटाई करण्यात आली होती. यात संरक्षित वन गटातील कटाई केलेली झाडे मिसळवून मालाची अफरातफर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याप्रकरणी उपवनसंरक्षक भंडारा वनविभाग भंडारा यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनुसार व शिफारसीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी वनसंरक्षक साठवणे यांचे निलंबन करण्यात आले होते. सदर प्रकरणाची चौकशी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ११ आरोपींमध्ये अटक करण्यात आली आहे. सरकारी गटामध्ये काही शेतकऱ्यांचे अतिक्रमण आहे. अतिक्रमीत गटामधील सागवानाची झाडे ठेकेदाराने कापून त्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला व लाखनीच्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून आरोपींना अटक केली होती. परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाल्याबद्दल परिसरातील आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)