बळजबरीने मतदानासाठी पोलीस पाटलाला भाग पाडले

By Admin | Updated: October 15, 2014 23:14 IST2014-10-15T23:14:56+5:302014-10-15T23:14:56+5:30

विधानसभा मतदारसंघातील सुुसरडोह येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान येथील पोलीस पाटील हरिप्रसाद खंडाते (६०) यांना शासकीय कर्मचाऱ्यांनी बळजबरीने मतदान करण्यासाठी भाग पाडले,

Forcibly forced the police party to vote | बळजबरीने मतदानासाठी पोलीस पाटलाला भाग पाडले

बळजबरीने मतदानासाठी पोलीस पाटलाला भाग पाडले

तुमसर : विधानसभा मतदारसंघातील सुुसरडोह येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. दरम्यान येथील पोलीस पाटील हरिप्रसाद खंडाते (६०) यांना शासकीय कर्मचाऱ्यांनी बळजबरीने मतदान करण्यासाठी भाग पाडले, असा आरोप सरपंच किशोर उईके यांनी केला आहे.
पोलीस पाटील शासनाचे प्रतिनिधी असले तरी ते गावातील सन्मानीय नागरिक आहेत. त्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याने अशी बळजबरी करणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सरपंच किशोर उईके यांनी केली आहे.
तुमसर विधानसभा मतदार संघातील १३ उमेदवारांचे भाग्य बुधवारी सायंकाळी ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले.
उमेदवार व समर्थकांच्या अंकगणितांना पूर्णविराम मिळाला असून १९ आॅक्टोबर रोजी १३ व्या विधानसभेचा सदस्य कोण होणार? हे निश्चित होईल. दरम्यान सुसुरडोह येथील मतदान केंद्रावर शासकीय कर्मचाऱ्यांनी दबाव टाकून पोलीस पाटलांना मतदान करावयास भाग पाडले.
तुमसर विधानसभा मतदारसंघात सुरूवातीपासून बहुरंगी लढत होती. एकूण मतदानाची टक्केवारी बघता तुमसर शहरात सरासरी ६० टक्के मतदान झाले. उर्वरीत क्षेत्रात ६८ ते ७० टक्के मतदान झाले. तुमसर शहरात सकाळपासून दुकाने बंद होती. दुपारनंतर हळूहळू सुरुझाली. प्रथमच संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. सकाळी दहा वाजतानंतर पावसाची रिपरिप सुरु झाली. त्यामुळे मतदानाची गती संथ पडली. दुपारपर्यंत मतदार वाढले परंतु शहरातील मतदारांमध्ये उत्साह दिसला नाही.
काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मागील १५ दिवसापासून मतदारसंघ पिंजून काढला. मतदार शेवटपर्यंत बोलला नाही. रुसवे फुगवे चालले. त्यानंतर पदाधिकारी प्रचाराला लागले. युती व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेले. सोबत राहणारे १५ दिवसात दूर झाले. या मतदारसंघात सुरुवातीपासूनच जात फॅक्टर महत्त्वाचा ठरला. शेवटच्या दोन दिवसात तो गौण दिसला.
पट्टीचा कार्यकर्ता तथा जवळचा असे समीकरण तयार झाले. व्यक्तीमत्वाला सुद्धा येथे महत्व प्राप्त झाले होते. एरव्ही मतदारांकरिता चारचाकी वाहने धावताना दिसत होत्या. त्या या निवडणुकीत दिसल्या नाहीत. महिला मतदारात उत्साह दिसला. शहरातील खापा टोली परिसरातील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात मतदारांच्या रांगा पाहावयास मिळाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Forcibly forced the police party to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.