रोजगार हमीच्या मजुरीकरिता पायपीट
By Admin | Updated: May 13, 2015 00:54 IST2015-05-13T00:54:59+5:302015-05-13T00:54:59+5:30
रोजगार हमी कामाची मजुरी किमान १५ दिवसात मिळणे अनिवार्य आहे.

रोजगार हमीच्या मजुरीकरिता पायपीट
तुमसर : रोजगार हमी कामाची मजुरी किमान १५ दिवसात मिळणे अनिवार्य आहे. मात्र, तुमसर तालुक्यात सहा आठवड्यांपासून मजुरांना मजुरी मिळाली नाही.
सुमारे ९०० मजुरांना तांत्रिक कारणामुळे फटका बसला. तालुक्यात ९७ ग्रामपंचायतीअंतर्गत ९६ हजार मजूर आहेत. २४ ते २५ हजार मजूर कामावर येतात. काही ग्रामपंचायतीचे कामे प्रस्तावित केली. परंतु दप्तरदिरंगाई व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे प्रत्यक्ष कामे सुरु झाली नाही. या ग्रामगपंचायतीवर कारवाई होणार असल्याचे समजते.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किमान १२० दिवस कामे मिळाली पाहिजे तर १५ दिवसात त्यांच्या खात्यावर मजुरी जमा होणे अनिवार्य आहे.
तालुकास्थळी (पंचायत समितीमध्ये) याकरिता स्वतंत्र कक्ष आहे. या कक्षात चार डाटा एन्ट्री आॅपरेटर आहेत. अनेक मजुरांचे खाते क्रमांक चुकीचे अपलोड करण्यात आले.
आधार कार्ड दुसऱ्याच्या नावावर टाकण्यात आले.यामुळे मजुरांच्या खात्यात मजुरी जमा झाली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयात याकरिता स्वतंत्र कक्ष देखरेखीकरिता आहे हे विशेष. विशेष कार्यक्रम अधिकाऱ्यांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. कामांचा भार जास्त आहे. आॅपरेटर्सची संख्या कमी असल्याचे समजते.
केवळ कामे प्रस्तावित केली आहे. कोट्यवधींची कामे प्रस्तावित केली. परंतु प्रत्यक्ष मजुरांना कामे मिळाली नाही. पावसाळा तोंडावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)