साकोलीच्या जागृत नागरिक मंचच्या नेतृत्वात होणार अन्न सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:34 IST2021-04-15T04:34:18+5:302021-04-15T04:34:18+5:30
नगर परिषद साकोली च्या धडाडीच्या महिला अधिकारी माधुरी मडावी यांची अचानक वर्धा येथे नविन पद निर्मिती करून त्या ठिकाणी ...

साकोलीच्या जागृत नागरिक मंचच्या नेतृत्वात होणार अन्न सत्याग्रह
नगर परिषद साकोली च्या धडाडीच्या महिला अधिकारी माधुरी मडावी यांची अचानक वर्धा येथे नविन पद निर्मिती करून त्या ठिकाणी बदली करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य व प्रतिष्ठित नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. सर्वप्रथम या असंतोषाला काॅ. शिवकुमार गणवीर यांनी दि. १५ एप्रिलपासून न. प. साकोली समोर आंदोलन करण्याचा इशारा देऊन वाचा फोडली.
दरम्यान, ही समस्या कोण्या एका राजकीय पक्षाची नसून सर्वसामान्य जनतेची व साकोली शहराचे विकास व उन्नतीसी निगडित असून हया करिता गावातील विविध पक्षीय प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला. त्यामुळे १४ एप्रिल २०२१ रोजी एक बैठक घेऊन सर्व प्रथम भारतीय संविधानाने शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आल्यानंतर बैठकीत नागरिक मंच साकोलीची स्थापना करण्यात आली.
१५ एप्रिल रोजी होणारे 'अन्न सत्याग्रह' आंदोलन नागरिक मंच साकोली च्या नेतृत्वात करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीत अध्यक्ष शिवकुमार गणवीर, उपाध्यक्ष अश्विन नशिने, प्रभाकर सपाटे, सुरेशसिंह बघेल. राजू साखरे, सचिव उमेश कठाने, सहसचिव सुरेश बोरकर, दिपक रामटेके, लता दुरुगकर, सुनंदा रामटेके, कोषाधयक्ष आशिष गुप्ता, संघटक राशिद कुरेशी, राधेश्याम खोब्रागडे, सल्लागार मदन रामटेके, मनिष कापगते, रवी परशुरामकर, सुभाष बागडे, कैलास गेडाम, अचल मेश्राम,अरूण चनने व सदस्य म्हणून शहरातील प्रतिष्ठित पुरूष व महिला नागरिक यात सहभागी झाले आहेत.