शहर विकासासाठी पाठपुरावा करा
By Admin | Updated: May 10, 2015 00:54 IST2015-05-10T00:54:15+5:302015-05-10T00:54:15+5:30
नागरिकांचे मुलभूत हक्क व शहराच्या विकासासाठी निरंतर प्रयत्नशील राहुन भंडारा शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतुने ...

शहर विकासासाठी पाठपुरावा करा
भंडारा : नागरिकांचे मुलभूत हक्क व शहराच्या विकासासाठी निरंतर प्रयत्नशील राहुन भंडारा शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या हेतुने शासन व प्रशासनाच्या पाठपुरावा करण्याकरिता जिल्हाधिकारी व नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले.
यावेळी भंडारा शहर सुधार संघर्ष समितीचे भैय्या साकुरे दिपक कुंभलकर, विलास मरस्कोल्हे, बबलु साकारे, श्रीकांत भोंगाडे, प्रल्हाद चिर्वतकर, यादोराव साकोरे तसेच नागरी हक्क संरक्षण समितीचे चंद्रकांत जनबंधु, जे. के. अंबुले, गोपाल चोपकर, देविदास बाहे व किसान महीला मंडळाचे गयनाबाई भुरे, सोनाबाई साकोरे, शितल सेलोकर, सुग्रता कुंभलकर, लक्ष्मी बोरकर उपस्थित होते.
शुक्रवारी पेठ, राजेंद्र वार्ड येथील मधुकर बोरकर यांचे घरापासून गोविंदा किसन धुर्वे यांच्या घरापर्यंत मोठया नाल्याचे बाधंकाम करण्यात यावे, भंडारा शहरातील व शुक्रवारी पेठ, नवीन टाकळी, मेंढा परिसरातील अवैध दारुविक्री, जुगार अड्डे, सट्टापट्टी बंद करुन संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, शुक्रवारी पेठ, राजेंद्र वार्ड येथील राजेंद्र प्रसाद पुतळा ते दुर्गा माता मंदिर पर्यंत रस्त्याचे बांधकाम करावे, न्यू फ्रेन्डस कॉलनी लालाजी लॉनच्या मागील मेश्राम पटवारी ते जयराज कनोजे यांचे घरापर्यंत नालीचे बांधकाम करावे, परिसरातील खुल्या नाल्यांवर काँक्रीटचे झाकण बसविण्यात यावे, भैय्या साकुरे यांचे घरापासून रमेश दंडारे यांचे घरापर्यंत नाली लेवलींगचे काम करण्यात यावे, पांढराबोडी रोड येथे लिल्हारे गुरुजीच्या घराजवळ बोअरवेल खोदण्यात यावी आदी मागण्याचा समावेश आहे.
सदर समस्येंमुळे परिसरातील वातावरण कलुषीत होवुन, रोगराई पसरुन, जीवीत व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. याकरिता विशेष बाब म्हणून लक्ष दयावे. सदर समस्यांचे निराकरण लवकर न झाल्यास झालेल्या परिणामास शासन व प्रशासनच जबाबदार राहील तसेच साखळी उपोषण करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी व नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)