शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

By Admin | Updated: January 8, 2017 00:29 IST2017-01-08T00:29:03+5:302017-01-08T00:29:03+5:30

निवडणूक आयोगाने नागपूर शिक्षक मतदार संघाचे द्विवार्षिक निवडणूक घोषित केली असून सदर निवडणुकीची आचारसंहिता भंडारा जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे.

Follow the code of conduct in the teacher constituency elections | शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

शिक्षक मतदार संघ निवडणुकीत आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

जिल्हाधिकारी यांचे आवाहन : प्रत्येक तालुक्यात भरारी पथक
जिल्ह्यात ३ हजार ६९९ मतदार, जिल्ह्यात १२ मतदान केंद्र
भंडारा : निवडणूक आयोगाने नागपूर शिक्षक मतदार संघाचे द्विवार्षिक निवडणूक घोषित केली असून सदर निवडणुकीची आचारसंहिता भंडारा जिल्ह्यात तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. या निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात यावे. मनीपॉवर रोखण्यावर भर देण्यासोबतच यासंदर्भात येणाऱ्या तक्रारी तात्काळ दखल घेण्याचे निर्देश सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज या संदर्भात बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विजय उरकुडे, अधीक्षक उत्पादन शुल्क सुरेंद्र मनपिया, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले व सर्व तहसीलदार उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्यात एकूण १२ मतदान केंद्र असून यात नाकाडोंगरी - ७५, तुमसर - ५५४, मोहाडी - १८९, भंडारा - १०७१, सावरी जवाहरनगर - ७३, धारगाव - ३८, साकोली - ४७४, लाखनी ४४०, पालांदूर - १०७, अड्याळ - १६०, पवनी - २५७ व लाखांदूर - २६१ असे एकुण ३ हजार ६९९ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी १० जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली जाणार आहे. १७ जानेवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून १८ जानेवारी रोजी अर्जाची छाननी करण्यात येईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २० जानेवारी असून शुक्रवार ३ फेब्रुवारी २०१७ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मतदान होईल. मतमोजणी ६ फेब्रुवारी २०१७ रोजी करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणुकीसंदर्भात कायदा व सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्त आराखडा १० जानेवारी सादर करण्यात यावा, आचारसंहिता असल्यामुळे पदाधिकारी यांची वाहने काढून न घेता त्या वाहनांचा गैरवापर होणार नाही याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, मतदान केंद्राची तपासणी करण्यासाठी पथकाची नियुक्ती तात्काळ करावी, मतदान केंद्रावर मूलभूत सुविधांची उपलब्धता असावी, मतदान पथकाची नेमणूक करून तहसीलदारांनी १२ जानेवारी पर्यंत अहवाल सादर करावा, इतर सर्व निवडणुकांप्रमाणे ही निवडणूक सुद्धा गांभीर्याने घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. कायदा व सुव्यवस्था, अवैध दारु, होर्डिंग - बॅनर काढणे व आचार संहितेचे पालन या संबंधिचा अहवाल आदर्श आचारसंहिता कक्षास नियमित पाठवावा. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने चित्रकला स्पर्धा, मतदान मशिनचे प्रात्यक्षिक, शालेय परिसंवाद, अर्ज स्वीकारण्यासाठी बॉक्स ठेवणे, युवा मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी युवा महोत्सव आयोजित करणे, सैन्य दलातील मतदार नोंदणी व राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Follow the code of conduct in the teacher constituency elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.