मोहाडी तहसील कार्यालयात पूरपरिस्थिती आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:23 IST2021-06-21T04:23:34+5:302021-06-21T04:23:34+5:30
मोहाडी तालुक्यात नदी काठावर राहणाऱ्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यावर चर्चा करण्यात आली. आमदार ...

मोहाडी तहसील कार्यालयात पूरपरिस्थिती आढावा बैठक
मोहाडी तालुक्यात नदी काठावर राहणाऱ्या गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, यावर चर्चा करण्यात आली. आमदार कारेमोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. या व्यतिरिक्त प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयाच्या स्थितीचाही आढावा घेतला. यावेळी अनेक आरोग्य केंद्राची स्थिती चांगली नसल्याचे निदर्शनात आले. यावर त्वरित अशा रुग्णालयाची स्थिती सुधारण्याचे आदेश दिले.
बैठकीला तहसीलदार देवीदास बोंबर्डे, पोलीस निरीक्षक सुधाकर चव्हाण वरठी, राहुल देशपांडे मोहाडी, सुरेश मट्टामी आंधळगाव, बांधकाम विभागाचे उपअभियंता शुक्ला, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, वनक्षेत्राधिकारी राठोड, कृषी अधिकारी मिरासे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण, वीज वितरण उपअभियंता सुनील मोहुरले, नगरपंचायतीचे बेंद्रे, नरवाडे, तसेच जलसंपदा, बालविकास आदी सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.