उड्डाण प् ाुलाचे काम बंद; मोबदल्याची मागणी
By Admin | Updated: February 28, 2015 00:54 IST2015-02-28T00:54:06+5:302015-02-28T00:54:06+5:30
तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुल पोचमार्गावरील घरमालकांनी जमिनीचा तथा तुटणाऱ्या घरांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटली आहे.

उड्डाण प् ाुलाचे काम बंद; मोबदल्याची मागणी
तुमसर : तुमसर रोड (देव्हाडी) येथे रेल्वे क्रॉसींगवर उड्डाणपुल पोचमार्गावरील घरमालकांनी जमिनीचा तथा तुटणाऱ्या घरांचा मोबदला द्यावा अशी मागणी रेटली आहे. दोन दिवसापासून काम बंद केले आहे. बुधवारी सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता तथा जागतिक बँक प्रकल्पाचे कार्यकारी अभियंत्यांनी येथे भेट दिली. काम रखडल्याने संबंधित निधी परत जाण्याची येथे शक्यता निर्माण झाली आहे.
रामटेक- तुमसर, तिरोडा-गोंदिया राज्य महामार्ग क्रमांक २४९ वर साखळी क्रमांक १३५/६०० किमी वर तुमसर रोड येथे मुंबई हावडा रेल्वे मार्ग छेदतो. वाहतुकीची कोंडी होत असल्याने उड्डाणपुल बांधण्याकरीता केंद्र व राज्य शासनाने निधी मंजूर केला. केंद्रीय मार्ग निधीतून २५ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली. तर संयुक्त प्रकल्प आहे. रेल्वे हद्दीतील काम रेल्वे तर राज्य शासनाच्या हद्दीतील काम सार्वजनिक बांधकाम खाते करीत आहे. या उड्डाणपुलाला जागतिक बँकेने निधी दिली आहे.
तुमसर रोड (देव्हाडी) परिसरात रस्त्याच्या बाजूला बायपास रस्ता तयार करणे सुरु आहे. पोचमार्ग तयार करतांनी स्थानिक घरमालकांचा काही भाग तथा भूखंड यात येत असल्याने मोबदल्याची मागणी केली. मोबदला द्या नाही तर कामे करु देणार नाही असा पवित्रा त्यांनी सन २००८ मध्ये उड्डाणपूलाचे काम बीओटी तत्वावर करण्याचा झाला होता. त्यामुळे काहींना मोबदला येथे मिळाला होता. त्यानंतर बिओटीनुसार बांधकाम करणे मागे पडले. जागतिक बँकेने येथे सरसकट निधी दिला. त्यामुळे येथे निधी देण्याकरिता राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून पुढील दिशा ठरणार आहे.
जागतिक बँक, बांधकाम उपविभाग नागपूर येथील सहाय्यक अभियंत्यांनी उपअधिक्षक, भूमि अभिलेख, तुमसर यांना रामटेक-तुमसर-तिरोडा-गोंदिया रस्त्यावर रेल्वे कॉसींग (मौजा देव्हाडी) च्या दोन्ही बाजूला ५०० मीटर लांबीच्या रस्त्याची मोजणी करण्याचे पत्र दिले. उपअधिक्षकांनी रस्त्याच्या जवळील १० ते १५ भूखंड गटाचे सातबारा सादर करण्याचे येथे निर्देश दिले आहे. तुमसर येथे भूमि उपअधिक्षकांचे नियमित पद आहे. परंतु त्यांच्याकडे इतर दोन तालुक्याचा अतिरिक्त कारभार असल्याने येथे तात्काळ कारवाई होण्यास विलंबाची शक्यता आहे.
मार्च अंतीम असल्याने या सर्व प्रक्रियेत निधी परत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बांधकाम विभागाने सर्वच विभागांचा ना हरकत येथे घेतली आहे. (तालुका प्रतिनिधी)