‘उड्डाण’ने दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संदेश

By Admin | Updated: March 9, 2017 00:35 IST2017-03-09T00:35:36+5:302017-03-09T00:35:36+5:30

मॅजिक बस इंडिया आणि टी.एम.एफ. यांच्या माध्यमातून उड्डाण प्रकल्पाच्या सहकार्याने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली.

'Flight' gave 'Beti Bachao, Beti Padhao' message | ‘उड्डाण’ने दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संदेश

‘उड्डाण’ने दिला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संदेश

जागतिक महिला दिन : शहरातून काढलेल्या रॅलीद्वारे जनजागृती, शेकडोंचा सहभाग
भंडारा : मॅजिक बस इंडिया आणि टी.एम.एफ. यांच्या माध्यमातून उड्डाण प्रकल्पाच्या सहकार्याने शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. यात शेकडो युवक व युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संदेश दिला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ही जनाजागृती रॅली काढण्यात आली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन भंडारा येथील बालकल्याण समिती सदस्य वैशाली सतदेवे यांचे हस्ते पार पाडले. या उत्सावात विविध उपक्रमाचे आयोजन करून या उपक्रमाचे माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दिनानिमित्त उड्डाण प्रकल्पाच्या वतीने भंडारा शहरातील मुख्य रस्त्याने प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रभातफेरीमध्ये स्त्रीभृण हत्या, बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व, घरघुती हिंसाचार यावर नारे व गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यासोबतच भंडारा शहरातील चौकाचौकात महिलांनी लेझीमच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश दिला.
यावेळी प्रबोधनात्मक पथनाट्याचे आयोजन केले होते. या पथनाट्यातून उड्डाण प्रकल्पाच्या एस.फॉर डी. सत्रातील व पहेला येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थी व प्रकल्पाच्या स्वयंसेविकांनी स्त्री-भृण हत्या, स्त्री-शिक्षण व घरघुती हिंसाचार यावर पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणाने जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. यात एस.फॉर डीचे स्वयंसेविका, उड्डाण रोजगार प्रशिक्षण केंद्राच्या युवती, व प्रकल्प क्षेत्रातील महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमासाठी दवडीपार येथील महिलांची चमू, पहेला येथील गांधी विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थीनी, पंचायत समिती सदस्य प्रमीला लांजेवार, भंडारा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, मॉ कॉम्प्लेक्सचे संचालक उजवणे, प्रकल्पाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी निक्की प्रेमानंद व त्यांच्या संपूर्ण चमूने सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा राऊत यांनी केले. तर आभार विनोद शंभरकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: 'Flight' gave 'Beti Bachao, Beti Padhao' message

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.