क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण
By Admin | Updated: August 11, 2015 00:47 IST2015-08-11T00:47:32+5:302015-08-11T00:47:32+5:30
शहर काँग्रेस कमेटीतर्फे स्थानिक गांधी चौकात ध्वजारोहण करून आॅगस्ट क्रांतीदिन साजरा केला. त्यानंतर मोटार सायकल रॅली काढून नगरातील चौकाचौकात महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले.

क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण
शहर काँग्रेसचा उपक्रम : मोटारसायकल रॅली काढून जागविल्या क्रांतीच्या आठवणी
पवनी : शहर काँग्रेस कमेटीतर्फे स्थानिक गांधी चौकात ध्वजारोहण करून आॅगस्ट क्रांतीदिन साजरा केला. त्यानंतर मोटार सायकल रॅली काढून नगरातील चौकाचौकात महापुरूषांच्या पुतळ्यांना माल्यार्पण केले.
गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पुर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर आझाद चौकात शहीद चंद्रशेखर आझाद, तुकडोजी चौकात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आंबेडकर चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज तसेच क्रांतीवीरांच्या जयस्तंभास माल्यार्पण करून क्रांतीदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष डॉ. प्रकाश देशकर, माजी जि.प. सभापती विकास राऊत, प्रगती पतसंस्था अध्यक्ष विजय रायपुरकर, जिल्हा मत्स्य उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, केशवराव शिंदे, राकेश बिसने, मनोहरराव उरकुडकर, मिरा उरकुडकर, तारा, फकीरा नागपुरे, अवनती राऊत, बाळासाहेब नागोसे, नगरसेवक धमेंद्र नंदरधने, रामभाऊ कुर्झेकर, गोपाल भिवगडे, उमेश रायपुरकर, गणेश जिभकाटे व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)