पाच हजार ज्योती कलशांची होणार स्थापना
By Admin | Updated: September 24, 2014 23:25 IST2014-09-24T23:25:38+5:302014-09-24T23:25:38+5:30
जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरूवात होत आहे़ दांडीया, गरबा, भजन, किर्तन, रांगोळी स्पर्धा , दुर्गा पाठ इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आगामी नऊ दिवसांत भाविकांना

पाच हजार ज्योती कलशांची होणार स्थापना
इंद्रपाल कटकवार/प्रशांत देसाई - भंडारा
जगतजननी आई जगदंबेच्या नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरूवात होत आहे़ दांडीया, गरबा, भजन, किर्तन, रांगोळी स्पर्धा , दुर्गा पाठ इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आगामी नऊ दिवसांत भाविकांना पहावयास मिळणार आहे़ जिल्हाभरात देवीच्या जागृत व पवित्र मंदिरात सुमारे पाच हजार ज्योतीकलशांची स्थापना उद्या दि़२५ सप्टेंबर रोजी केली जाणार आहे़
हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या माता दुर्गा व तिच्या नऊ रुपांच्या दर्शनाची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात़
चैत्र व अश्विन महिन्यात माँ दुर्गेची आराधना करण्यात येते़ अश्विन (शुक्ल पक्ष) महिन्यात करण्यात येणाऱ्या मातेच्या भक्तीला ‘अनन्यसाधारण भक्ती’ असे म्हणतात़ या नऊ दिवसात भाविक मातेच्या चरणी अक्षरक्ष: लोटांगण घालतात़
गत पाच दिवसांपासून नवरात्र उत्सवाच्या तयारीला जोर आलेला आहे़ जिल्ह्यात ३११ ठिकाणी सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे माँ दुर्गा तर २०१ ठिकाणी माँ शारदेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे़ यावेळी संपूर्ण शहर रोषनाईने न्हावून निघणार आहे़
मूर्तीकार देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवित आहेत. रात्री उशिरापर्यंत दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी ढोल ताशांच्या गजरात दुर्गा मातेची मुर्ती मंडपस्थळी नेताना दिसले.