शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
'मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली'; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
5
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
6
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
7
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
8
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
9
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
10
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
11
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
12
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
13
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
14
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
15
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
16
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
17
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
18
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
19
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
20
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल

दिवसभरात आढळले पाच पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 5:00 AM

साकोली येथील तालुका प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून आलेल्या मजुरांपैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी उशिरा घोषित केले. यात या सर्व चारही जणांना गावात जाण्यापूर्वीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. या चारही जणांचा पॉझिटिव्ह अहवाल सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

ठळक मुद्देकोरोनाबाधीतांची संख्या आठवर : रेडझोनमधून आलेल्यांनी स्वत:हून पुढे येण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रविवारी दोन कोविड रुग्ण आढळल्यानंतर सोमवारी नव्याने पाच जणांची त्यात वाढ झाली. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेवून लाखनी येथील एका कोविड रुग्णाची माहिती दिली होती. तर सायंकाळी उशिरा ७.२९ वाजता जिल्हा प्रशासनाने साकोली तालुक्यातील चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे घोषित केले.दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी एम. जे. प्रदिपचंद्रन यांनी पत्रपरिषद घेत लाखनी येथील एका १९ वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. हा तरुण नाशिक येथून ट्रकमध्ये बसून आला होता. त्याची ठाणा पेट्रोलपंप येथे विचारपूस करुन थेट संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. १३ मे रोजी नाशिक येथून निघून तो १४ मे रोजी भंडारा जिल्ह्यात दाखल झाला. त्याच दिवशी त्याला क्वारंटाईन करुन त्याच्या घशातील नमुना तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आला होता. सोमवारी सकाळी त्याचा अहवाल प्राप्त होताच तो पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.साकोली येथील तालुका प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथून आलेल्या मजुरांपैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी उशिरा घोषित केले. यात या सर्व चारही जणांना गावात जाण्यापूर्वीच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. या चारही जणांचा पॉझिटिव्ह अहवाल सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.लाखनी येथील तालुका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव काढण्यासाठी लाखनी नगर पंचायतने दर मंगळवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार बंद ठेवला आहे. औषधी दुकाने सोडून इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. मुरमाडी, सावरी ग्रामपंचायत हद्दीतील व्यवसायीक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत.भंडारा शहरात एक दिवसाच्या अंतराने दुकाने उघडली जात आहे. मात्र दुकाने उघडताच नागरिकांची एकच गर्दी रस्त्यावर पहायला मिळत आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्गाचा धोका बळावण्याची चिन्हे आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करुन गर्दी टाळावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. परंतु भंडारा शहरातील मुख्य रस्त्यांवर दुपारच्या सुमारास गर्दी दिसून येत आहे.तपासणीसाठी स्वत:हून समोर यावेरेड झोनमधून जिल्ह्यात दाखल झालेल्या नागरिकांना शोधून काढण्याचे कार्य जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र प्रत्येकापर्यंत पोहोचणे मनुष्यबळाच्या तुलनेत शक्य नाही. परिणामी रेडझोनमधून किंवा अन्य ठिकाणाहून आलेल्यांनी स्वत:हून समोर येत वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नागरिकांनी कुठलीही चिंता न बाळगता तपासणी केल्यास कोविड संसर्गाचा प्रसार होण्यावर आळा घालता येईल, असेही ते म्हणाले. आतापर्यंत जवळपास ९ हजारांच्या वर ई-पासेसच्या माध्यमातून नागरिकांना जिल्ह्यात येण्याची परवानगी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.जिल्ह्यात पुणे, मुंबईसह अन्य राज्यातून आले ३३,३३७ व्यक्तीमुंबई, पुणे यासह अन्य राज्यातून भंडारा जिल्ह्यात ३३ हजार ३३७ व्यक्ती आले आहेत. त्यापैकी २३ हजार ८३८ जणांचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच उर्वरित ९४९९ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आयसोलेशन वॉर्डातून आतापर्यंत २२६ व्यक्तींना सुटी देण्यात आली असून ३० जण भरती आहेत. नर्सिंग होस्टलमध्ये जिल्हाभरातून १७० व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून ४९८ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या