चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:38 IST2018-06-03T22:37:59+5:302018-06-03T22:38:09+5:30
चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार असल्याची घटना कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे झाली.

चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
उसर्रा : चितळ शिकारप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार असल्याची घटना कांद्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या देऊळगाव येथे झाली.
याबाबद असे की, गोपनीय माहितीच्या आधारे गावात चितळाची शिकार घडली असल्याचे बिट वनरक्षक मोहन गंधारे यांना मिळाली. त्या आधारे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून पाच आरोपींना अटक केली. यात प्रकाश धुर्वे (३३), नत्थू खोब्रागडे (६३), राजेश खोब्रागडे (४५), आत्माराम उईके (३६), अनंतराम मोहनकर (५०) यांना अटक केली आहे. तर सैन्यपाल खोब्रागडे असे फरार आरोपीचे नाव असून वनकर्मचारी त्याच्या शोधात आहेत. आरोपीकडून चितळाचे मांस, तराजू, गंज, झाकण, शिजलेले मास, लाकडी ओंडका, रक्ताने माखलेले प्लास्टीक पोते आदी साहित्य जप्त करण्यात आले.
आरोपीवर वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, २७, ५१(१), ५२, २६ अंतर्गत कारवाई करुन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे. उपवनसंरक्षक भंडारा व सहा. उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी डी.पी. चकोले, क्षेत्र सहायक एस. जी. बुंदेले, मोहन गंधारे, मनोहर भुते, अनिल झंझाड, जी. डी. हात्ते, हटवार, नरेन गजभिये तपास करीत आहे.