धान घोटाळ्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: December 29, 2016 01:57 IST2016-12-29T01:57:56+5:302016-12-29T01:57:56+5:30

सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि मोहाडीत राज्य शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यात

Five days police custody for accused in Paddy scam | धान घोटाळ्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

धान घोटाळ्यातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

चरण वाघमारेंनी आणले होते प्रकरण उघडकीस : शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना लाभ झाल्याचा आरोप
भंडारा : सन २०१४ मध्ये जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि मोहाडीत राज्य शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्रावर करण्यात आलेल्या धान खरेदीत ५ कोटी ७२ लाख रूपयांचा गैरव्यवहार झाला होता. या प्रकरणात जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यासह तिघांना मंगळवारला अटक करण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. सीआयडीने मंगळवारला तत्कालीन जिल्हा मार्केटींग अधिकारी रमेश ठोसरे, वरिष्ठ सहायक अनिल बोंगिरवार, गोपाल साखरवाडे यांना अटक केली. बुधवारला दुपारी भंडारा प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. यासंदर्भात सीआयडीचे पोलीस निरीक्षक एच.पी. झिंगरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या आरोपींची सखोल चौकशी करण्यात येईल. आरोपींना १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली परंतु न्यायालयाने पाच दिवसाची कोठडी दिली असून २ जानेवारीला त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे प्रकरण तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांनी उघडकीस आणले होते, हे विशेष. (जिल्हा प्रतिनिधी)

२२ जणांकडून केली होती १.५ लाख क्विंटल धान खरेदी
या धान घोटाळ्यात २२ आधारभूत खरेदी केंद्राचे संचालक मंडळ दोषी आढळले होते. सीआयडीने केलेल्या तपासात समर्थन मुल्याचा खरेदी अंतर्गत सन २०१४ मध्ये एक-एक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी १०० क्विंटल धान खरेदी केले होते. २२ लोकांकडून १ लाख ५० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. चुकारे धनादेशाने देण्यात आले होते. परंतु धनादेशाची पावती आणि धनादेशावरील नावात विसंगती आढळून आली. समर्थन मुल्यावर केलेल्या धान खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांऐवजी व्यापारी आणि आधारभूत धान खरेदी केंद्रांच्या पदाधिकाऱ्यांनाच लाभ मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.

 

 

Web Title: Five days police custody for accused in Paddy scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.