कृषी पंपांची पाच कोटींची थकबाकी
By Admin | Updated: May 29, 2014 23:46 IST2014-05-29T23:46:19+5:302014-05-29T23:46:19+5:30
राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग साकोली अंतर्गत ९ हजार ४५0 कृषी पंपधारक असून त्यांच्यावर ५ कोटी १३ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. सततची नापिकी व विद्युत दरामध्ये भरमसाठ वाढ या

कृषी पंपांची पाच कोटींची थकबाकी
शेतकर्यांमध्ये धास्ती : साकोली उपविभागात ९ हजार ४५0 कृषी पंप
साकोली : राज्य वीज वितरण कंपनी उपविभाग साकोली अंतर्गत ९ हजार ४५0 कृषी पंपधारक असून त्यांच्यावर ५ कोटी १३ लक्ष रूपयांची थकबाकी आहे. सततची नापिकी व विद्युत दरामध्ये भरमसाठ वाढ या कारणामुळे शेतकर्यांना थकबाकीला सामोरे जावे लागत आहे.
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या साकोली उपविभाग अंतर्गत साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्याचा समावेश आहे. साकोली तालुक्यात २ हजार ७८८, लाखनी २ हजार ६७0, तर लाखांदूर तालुक्यात तीन हजार ९९२ कृषीपंपधारक आहे. या कृषीपंप धारकांवर जवळपास पाच कोटी १३ लक्ष १५ हजार रूपयांची थकबाकी आहे. यापैकी साकोली १ कोटी ३६ लक्ष ६४ हजार, लाखनी १ कोटी २२ लक्ष ९६ हजार तर लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक दोन कोटी ५३ लक्ष ५८ हजार रूपयांची थकबाकी कृषी पंपधारकांवर आहे.
३0 एप्रिल २0१४ पर्यंत साकोली उपविभागात अस्थायी विद्युत तोडणी, ३३६ पंपधारक असून थकबाकी १४ लक्ष ७८३ रूपये इतकी आहे. लाखनी तालुक्यात ४६२ विज तोडणी असून थकबाकी २२ लक्ष ५१९ रूपये आहे. लाखांदूर तालुक्यात १६९५ शेतकर्यांच्या शेतात अस्थायी विज तोडणी आहे.
थकबाकी ९२ लक्ष ४३९ रूपये आहे. साकोली उपविभागांतर्गत नेहमीकरीता ८१२ कृषी पंपाची जोडणी कापण्यात आली आहे. त्यांच्यावर एक कोटी १७ लाखांची थकबाकी बाकी आहे.
ज्या कृषिपंपाचा विद्युत पुरवठा अस्थायी स्वरूपात खंडीत करण्यात आला आहे, त्यांना थकबाकी भरून पुरवठा पूर्ववत करण्याचे धोरण आहे. ज्या फिडरवर विद्युत थारकांचे ९0 टक्के विद्युत बिलाचा भरणा केला आहे तेथे भारनियमन केले जात नाही. मात्र सा ६0 टक्यांपेक्षा कमी विद्युत बिलाचा भरणा कमी असलेल्या फिडरवर सात ते नऊ तासांचे भारनियमन अपेक्षित असल्याचे कार्यकारी अभियंता धनविजय यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)