शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

पवनी तहसील कार्यालयावर मासेमारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 22:28 IST

मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. या आंदोलनात हजारो मासेमार बांधव सहभागी झाले होते.

ठळक मुद्देआणखी किती दिवस अन्याय सहन करायचा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दे-धक्का आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. या आंदोलनात हजारो मासेमार बांधव सहभागी झाले होते.स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही मासेमार समाज शासकीय योजनांपासून वंचित आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सरकारने कोणतेही ठोस पावले उचलले नाही त्यामुळे या समाजाचा वापर केवळ निवडणूक पुरते करून घेतला जात आहे. त्यामुळे या समाजाची सामाजिक, आर्थिक, बौद्धीक व राजकीय उन्नती होऊ शकलेली नाही. आता या समाजाला हक्काची जाणीव झाली असून संघटित होऊन आंदोलन करण्यात येत आहे.भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेच्या संयुक्त विद्यमाने भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १५ ही दे धक्का आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारला, पवनी तहसील कार्यालयात दे धक्का आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्याकडे लक्ष द्या अन्यथा आम्ही राज्यकर्त्यांना भविष्यात होणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवून देणार असा गर्भित ईशाराही दिला आहे.तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात ३० जुन २०१७ चा मत्स्य व्यवसायाचा शासन निर्णय रद्द करून तलाव, जलाशयाचे कंत्राट पुर्ववत लिजवर देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थेत विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त भटक्या जमातींना १३ टक्के आरक्षण देण्यात यावे. लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात आर्थिक तरतुद करण्यात यावी. धरणाखालील भागात मासेमारी व डांगरवाड्याच्या व्यवसाय पूर्णत: बंद पडल्यामुळे मासेमारांना प्रकल्पग्रस्त घोषित करून सुविधा पुरविण्यात यावे, मामा तलावातील गाळ उपसा करून तलावातील अतिक्रमणे काढण्यात यावे, जलाशयात पिढयानपिढया मासेमारी करीत असताना त्याची नोंद महसूल रेकॉर्डवर नमुद करण्यात यावे, २०० हेक्टरवरील जलाशयावर एकापेक्षा जास्त संस्थेची नोंदणी करण्याचा शासन निर्णय रद्द करून १००० हेक्टरवरील जलाशयावर दुसरी संस्था निर्माण करण्याचा शासन निर्णय करण्यात यावा, व्याघ्र प्रकल्पातील तलाव पर्यटन विकास महामंडळाकडे हस्तांतरीत केलेल्या तलावावर स्थानिक सहकारी संस्थांना मासेमारीकरिता देण्यात यावे, अनुसूचित जातीप्रमाणे जिल्हा व तालुका ठिकाणी भटक्या विमुक्त जाती जमातींना स्वतंत्र वसतिगृहे उघडण्यात यावे, भटक्या विमुक्त जाती जमातीचे प्रलंबित शिष्यवृत्ती देण्यात यावी, पेसा कायदा रद्द करून अनुसूचित जमाती क्षेत्रातील सर्व तलावाचे मासेमारीचे हक्क परंपरागत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थाना देण्यात यावे अशा मागण्यांचा समावेश आहे.या दे धक्का आंदोलनाचे नेतृत्व भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे यांनी केले. या आंदोलनात संघर्ष वाहिनीचे दिनानाथ वाघमारे, जनार्दन खेडकर, आनंदराव अंगतवार, राजेश येमहोदव वाघमारे, हर्षल वाघमारे, मिरा नागपुरे, देविदास नगरे, अजय मोहनकर, शेखर पचारे, चंद्रशेखर पचारे, विकास शिरकर, श्रावण कांबळी, दागो कुंभले, निलकंठ वाघमारे, संजय चोचेरे, सुनिल शिवरकर, शरद शिवरकर यांच्यासह मासेमार बांधव सहभागी होते.