शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
2
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
3
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
4
Stock Market Today: ३८६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; PSU बँक आणि रियल्टी क्षेत्रात गुंतवणूकदा बुलिश
5
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
6
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
7
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
8
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
9
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
10
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
11
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती
12
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
13
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
14
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
15
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
16
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
18
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
19
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
20
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ

पहिल्याच पावसात झाली पवनी महामार्गाची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:01 IST

अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्लिप होऊन त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायी व्यवस्था असती वाहन चालकांना त्रास झाला नसता.

ठळक मुद्देचिखलच चिखल। घसरगुंडीने वाहनचालकांचा जीव धोक्यात

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा - पवनी महामार्गाचे बांधकामात मुरुमाऐवजी मोठ्याप्रमाणात माती घालण्यात आल्याची अनेक दिवसांपासून ओरड होती. शुक्रवारी झालेल्या पहिल्याच पावसाने महामार्गावर माती की मुरूम घातला आहे, याची अखेर पोलखोल झाली आहे.सध्या अड्याळ ते नेरलाच्या पुढे ठीकठिकाणी महामार्गाचे बांधकाम संथपणे सुरू आहे. त्यातही कंत्राटदार यांचा मनमर्जी कारभार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्लिप होऊन त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पर्यायी व्यवस्था असती वाहन चालकांना त्रास झाला नसता. रात्री अपरात्री एखाद्या रुग्ण किंवा अतिआवश्यक कामाकरिता तात्काळ या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे स्वत:च्या पायावर स्वत:च कुºहाड मारण्यासारखी स्थिती आहे. यावर तात्काळ उपाय म्हणून जिल्हा प्रशासन वा संबंधित विभाग किंवा कंत्राटदार यांनी लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची मागणी अड्याळ, नेरला येथील ग्रामस्थांसह, वाहन चालक, तसेच प्रवाशांनी केली आहे.कित्येकांच्या चारचाकी चिखलात फसल्या गेली. शेकडो दुचाकी वाहन धारकांना गाडी ढकलत ढकलत आणावी लागली. महामार्गावर माती असल्याने एकतर घसरण तर दुसरीकडे दोन्ही चाकात मातीच माती जात असल्याने वाहन पुढे जात नाही. त्यामुळे बरेचशे दुचाकी वाहन धारक वाहन पायदळ आणण्यासाठी व अपघात टाळतांना दिसत होते. महामार्गाचे बांधकाम प्रवाशांच्या सुविधांसाठी करीत असले तरी ते काम करताना प्रवाशांना, ग्रामस्थांना, वाहन धारकानाही त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Rainपाऊस