गोठ्याला आग; तीन जनावरांचा कोळसा

By Admin | Updated: April 11, 2016 00:26 IST2016-04-11T00:26:32+5:302016-04-11T00:26:32+5:30

पोलीस स्टेशन अंतर्गत बाम्हणी येथील शेतकरी गजानन मेश्राम यांच्या शेतातील गाईच्या गोठ्याला अचानक रात्री आग लागल्यामुळे

Fireplace; Three animal coal | गोठ्याला आग; तीन जनावरांचा कोळसा

गोठ्याला आग; तीन जनावरांचा कोळसा


पवनी : पोलीस स्टेशन अंतर्गत बाम्हणी येथील शेतकरी गजानन मेश्राम यांच्या शेतातील गाईच्या गोठ्याला अचानक रात्री आग लागल्यामुळे २ गाई व १ वासरू जळून राख झाले.
या शेतकऱ्याचा गोठा गावापासून त्यांच्या स्वात:च्या शेतात गोठा आहे. लागूनच स्मशानभूमी आहे. रात्री सुमारे २ वाजता अचानक आग लागल्यामुळे गोठ्यातील खतवैरण व शेतीअवजारे जळून राख झाले. हा शेतकरी रोजच्या प्रमाणे आपली जनावरे गोठ्यात बांधत होता. हा गोठा गावापासून दूर असल्यामुळे आग लागून सुद्धा कोणत्याच गावकऱ्यांच्या लक्षात आले नाही. पहाटेपर्यंत गोठा जळात होता. तोपर्यंत मात्र सर्वकाही जळून राख झाले होते. या शेतकऱ्यावर अनेक बँकाचे कर्ज थकीत आहे. येथील तलाठी यांनी पंचनामा केला. यात या शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fireplace; Three animal coal