सिहोरा येथे रेडिमेड कापड्याच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:59+5:302021-06-09T04:43:59+5:30

तुमसर ते बपेरा राज्य मार्गाच्या शेजारी संजय गौपाले यांचे रेडिमेड कापड दुकान आहे. सोमवारी त्यांनी ४ वाजता आपले दुकान ...

Fire at a readymade garments shop at Sihora | सिहोरा येथे रेडिमेड कापड्याच्या दुकानाला आग

सिहोरा येथे रेडिमेड कापड्याच्या दुकानाला आग

तुमसर ते बपेरा राज्य मार्गाच्या शेजारी संजय गौपाले यांचे रेडिमेड कापड दुकान आहे. सोमवारी त्यांनी ४ वाजता आपले दुकान बंद केले. रात्री १२ वाजताच्या सुमारास दुकानातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. ही माहिती गौपाले यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ दुकानाकडे धाव घेतली. बाजूला असलेल्या मोटार पंप दुकानातील पंपाच्या साहाय्याने पाण्याचा मारा करण्यात आला. तोपर्यंत नागरिकांची गर्दी झाली होती. गावकऱ्यांनी आग आटाेक्यात आणण्यासाठी मदत केली. दुकानातील कापडाचे डब्बे बाहेर काढण्यात आले. मात्र, सर्व कापड आगीने जळाल्याचे दिसून आले. यात सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती सिहोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना संकटाने वर्षभरापासून आधीच व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात आला आगीने दुकान भस्मसात केले. दुकानदाराला तत्काळ मदत देण्याची मागणी होत आहे.

Web Title: Fire at a readymade garments shop at Sihora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.