एलआयसी कार्यालयाला आग
By Admin | Updated: May 27, 2014 00:28 IST2014-05-27T00:28:15+5:302014-05-27T00:28:15+5:30
शहरातस्थित एलआयसी कार्यालयाला काल सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दोन लक्ष रूपयांचा साहित्य जळून खाक झाले. पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने आगीवर

एलआयसी कार्यालयाला आग
साकोलीत शॉर्ट सर्किटने लागली : दोन लाखांच्यावर साहित्यांचे नुकसान साकोली : शहरातस्थित एलआयसी कार्यालयाला काल सायंकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. यात दोन लक्ष रूपयांचा साहित्य जळून खाक झाले. पोलीस व नागरिकांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. रात्री ९ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एलआयसीच्या कार्यालयाला अचानक आग लागली. कार्यालय रस्त्यावरच असल्याने घटना पटकन लक्षात आली. आग लागल्याची माहिती तत्काळ एलआयसीच्या अधिकार्यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात येत नसल्यामुळे भंडारा, तुमसर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र साकोलीपासून घटनास्थळाचे अंतर जास्त असल्यामुळे अग्निशमन दलाला यायला उशिर झाला. या आगीत कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे, संगणक, पंखे, फर्निचर जळून खाक झाले. जवळपास दोन लक्ष रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमन पोहचेपर्यंत स्थानिक पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले. (तालुका प्रतिनिधी)