आगीत घर जळाले
By Admin | Updated: March 4, 2017 00:22 IST2017-03-04T00:22:38+5:302017-03-04T00:22:38+5:30
शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह दीड लक्ष रुपयांचे नुकसान झाले.

आगीत घर जळाले
नांदोरा येथील घटना : दीड लाखांचे नुकसान
शहापूर : शॉर्ट सर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत जीवनोपयोगी साहित्यासह दीड लक्ष रुपयांचे नुकसान झाले. ही घटना नांदोरा येथे गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास भिक्षुक आडकूजी पिकलमुंडे यांच्याकडे घडली. महसुल प्रशासनाने पंचनामा केला.
नांदोरा येथील भिक्षुक पिकलमुंडे राहत असलेल्या तथा त्यांच्या बाजूला असलेल्या मोठ्या भावाच्या खोलीमध्ये अकस्मात आग लागली. यात जिवनोपयोगी साहित्य जळून खाक झाली.
विशेष म्हणजे भिक्षूक पिकलमुंडे यांची १५ वर्षीय शुभांगी नामक पुतणी आतमध्ये सापडली. यावेळी मोठ्या प्रयत्नाने तिला सुखरुप बाहेर काढण्यात आले.
शेजा-यांनी वेळीच धाव घेवून मोटारपंपाच्या सहायाने आगीवर निंयत्रण मिळविले. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दु्रगकर यांनी भेट दिली.
यावेळी तलाठी प्रविण जगताप यांनी पंचनामा करुन दीड लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. यावेळी मंडळ अधिकारी जयंत सोनवाने, विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता दलाल, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष उपस्थित होते. (वार्ताहर)