मुंढरी येथे आगीत घर जळून भस्मसात
By Admin | Updated: June 7, 2014 01:24 IST2014-06-07T01:24:36+5:302014-06-07T01:24:36+5:30
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले असून चार लाखांचे

मुंढरी येथे आगीत घर जळून भस्मसात
चार लाखांचे नुकसान : ग्रामस्थांच्या मदतीमुळे अनर्थ टळला
करडी (पालोरा) : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर भस्मसात झाले असून चार लाखांचे नुकसान झाले. ही घटना मोहाडी तालुक्यातील मुंढरी खुर्द येथे आज शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
मनोहर हरीराम बांते रा.मुंढरी खुर्द यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग सर्व्हिस वायरमध्ये ठिणगी पडल्याने लागली. आगीने रोद्र रूप धारण केले होते.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तुमसर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल, पोलीस व ग्रामस्थांच्या सहकार्याने अखेर दोन तासानंतर आग विझविण्यात आली. भीषण आगीमुळे गाव भस्मसात होण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती. घटनेची माहिती पोलीस व महसूल विभागाला देण्यात आली. यांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करण्यात आला. घरातील जीवनावश्यक वस्तूसह चार लाखांचे साहित्य आगीत भस्मसात झाले. अधिक तपास करडी पोलीस चौकीचे सहायक फौजदार अश्विन मेहर, नायक विजय नासरे करीत आहे.
उन्हाचे दिवस असल्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांची वर्दळ नव्हती. आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने धावून आले. मिळेल त्या साधनाने आग विझविण्यासाठी धडपड करु लागले. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे घरातील साहित्य पुर्णत: जळाले. या आगीत सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असून सानुग्रह मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)