आगीत टायर जळून खाक

By Admin | Updated: March 1, 2015 00:34 IST2015-03-01T00:34:19+5:302015-03-01T00:34:19+5:30

जळत्या कचऱ्याची ठिगणी टायरवर पडल्याने टायर दुकानातील सुमारे १०० टायर जळून खाक झाले. दुकानाच्या बाजूलाच सुमारे १०० मीटर अंतरावर पेट्रोप पंप होते.

Fire brigade tires | आगीत टायर जळून खाक

आगीत टायर जळून खाक

तुमसर : जळत्या कचऱ्याची ठिगणी टायरवर पडल्याने टायर दुकानातील सुमारे १०० टायर जळून खाक झाले. दुकानाच्या बाजूलाच सुमारे १०० मीटर अंतरावर पेट्रोप पंप होते. गाळ्यातील इतर सहा दुकानेही थोडक्यात बचावली. येथे मोठा अनर्थ टळला. अग्नीशामकाने आगीवर नियंत्रण आणले. ही घटना आज शनिवारला दुपारी ११.३० वाजता खापा चौकात घडली.
खापा चौकात रियाज टायरवाला यांचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात १०० ते १५० ट्रकसह इतर वाहनांचे खराब टायर ठेवले होते. बाजूलाच कचरा जळत होता. त्या कचऱ्याच्या आगीची ठिगणी एका टायरवर पडली. पाहता-पाहता आगीने रौद्ररुप धारण केले. ठेवलेले १०० टायर आगीत भस्मसात झाले.
या दुकानापासून केवळ १०० मीटर अंतरावर रिजवी यांचे पेट्रोलपंप आहे. आगीचे डोंब उडाल्याने परिसरात भिती निर्माण झाली होती. तुमसर-भंडारा राज्य महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती. तुमसर येथील नगर परिषदेची अग्नीशामक गाडी, भाऊराव तुमसरे यांचा पाण्याचा टँकर, विठ्ठलराव कहालकर यांचेकडील पाणी टँकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण आणले.
टायर दुकानाजवळील गाळे पंढरी शेंडे, राधेश्याम भोयर, बालू मोहरकर, तन्मय बडवाईक, गिरीपुंजे गॅरेज व मनोज ढाबा यांचे दुकान थोडक्यात बचावली. या गाळ्यामागील भाग आगीने भाजल्यासारखा झाला. आगीवर नियंत्रण आणल्याने लाखोंची हाणी टळली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Fire brigade tires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.