नाना पटोले यांचे प्रतिपादन : पाथरीत सत्कार सोहळापालांदूर : पाश्चात्य संस्कृतीच्या मागे न धावता संस्कृतीचे जतन करा. भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. संस्कृती जीवंत ठेवण्याकरिता ज्येष्ठांचा सन्मान झाला पाहिजे. देव आईवडीलांच्या सेवेत शोधा. स्वत:च्या कर्मात देव शोधा. ज्येष्ठांचा सत्कार नसून त्यांच्या कर्माचा सत्कार असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी पाथरी येथे रविवारला आयोजित सत्कार सोहळ्यात केले. कार्यक्रमाला रामविलास सारडा, प्रा.युवराज खोब्रागडे, माणिकराव चेटुले, मंगला कोल्हे, सरपंच उषा फुंडे, ए.भ. पाखमोडे, सत्कारमूर्ती श्रावण शेंडे, भरत खंडाईत, डमदेव कहालकर, ठाणेदार एच.एम. सय्यद तथा सत्कारमूर्ती ज्येष्ठ मंडळी हजर होते.खा.पटोले यांनी शेतकऱ्यांना चांगले दिवस देण्याकरिता मी कटीबद्ध आहे. तांदळाला मोठी बाजारपेठ लवकरच उपलब्ध होत आहे. खरीपाचे धान छत्तीसगड शासनाच्या धर्तीवर नगदी रुपाने खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जन्मशताब्धीवर्षात लोकसभेत संविधान जागृती होणार आहे. वैनगंगा महोत्सव नवीन वर्षात होत आहे. वैनगंगा प्रदूषणमुक्त करण्याकरिता नागनदीचे पाणी दुसरीकडे वळविण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठक पुढच्या आठवड्यात आयोजिली आहे. प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डमदेव कहालकर, आभार सहसचिव पृथ्वीराज मेश्राम यांनी सांभाळले. विशेष बाब म्हणजे सत्कारमूर्ती श्रावण शेंडे (सपाटे) पाथरी यांच्या वतीने संपूर्ण गावकऱ्यांना व आमंत्रीत पाहुण्यांना महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाकरिता सरपंच हेमंत सेलोकर, खुनारी, सरपंच उषा फुंडे पाथरी, पो.पा. वाल्मीक कोरे पाथरी, कपडा व्यापारी भगवान शेंडे, यशवंत शेंडे, शिक्षक हरिश्चंद्र लाडे, जितेंद्र कठाणे, तुलसीदास फुंडे, धनराज कोरे, पुरुषोत्तम बोकडे, केशव सोनवाने, भीष्माचार्य हत्तीमारे, शिवचरण कोरे, नारायण कोरे आदींनी स्वयंप्रेरणेने सहकार्य केले. (वार्ताहर)
आईवडिलांच्या सेवेत देव शोधा
By admin | Updated: October 6, 2015 00:48 IST