शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक थांबणार
By Admin | Updated: October 28, 2014 22:53 IST2014-10-28T22:53:02+5:302014-10-28T22:53:02+5:30
प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन देयके शालेय वेतन प्रणालीनुसार तयार करण्यासाठी शिक्षकांना दरमहा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी

शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक थांबणार
भंडारा : प्राथमिक शिक्षकांचे मासिक वेतन देयके शालेय वेतन प्रणालीनुसार तयार करण्यासाठी शिक्षकांना दरमहा आर्थिक भुर्दंड बसत होता. मात्र या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शिक्षकांची आर्थिक लुबाडणूक थांबण्याचे चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्याप्त आहे.
संघातर्फे जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शिक्षकांनी वेतन देयक तयार करण्याची जबाबदारी पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अधिनस्त डाटा एन्ट्री आॅपरेटर व एम.आय.एस. यांच्यावर थोपविण्यात आली आहे. त्यामुळे नोव्हेंबर पासून वेतन तयार करण्याचे काम पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे आहे. त्यामुळे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या अधिनस्त शिक्षकांच्या वेतनासंबंधी माहितीसह गटशिक्षणाधिकारी यांनी निश्चित केलेल्या तारखेला पंचायत समितीमध्ये उपस्थित होणे आहे. आॅपरेटरकडून शाळेच्या देयकाची एक प्रत लॉग इन करून मुख्याध्यापकांनी स्वीकारायची आहे. या पत्रान्वये कारवाईसंबंधाने पुढाकार घेऊन तालुका संघाने कारवाई करावी. असे आदेश मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी दिले आहे. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मुबारक सैय्यद, संजीव बावनकर, राजेश सूर्यवंशी, विरेंद्र निंबार्ते, धनंजय बिरणवार, राधेशाम आमकर, विनायक मोथारकर, तेजराम वाघाये, रजनी करंजेकर, अनिल गायधने, राजन सव्वालाखे, दिलीप बागडे, रामरतन माहुर्ले, धनंजय नागदेवे, राकेश चिचाम, अरविंद रामटेके आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)