संचारबंदी काळात छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:50+5:302021-05-11T04:37:50+5:30
भुयार : मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारने कोरोना नियंत्रित व्हावा यासाठी संचारबंदी घोषित केली. त्यामुळे गरिबाचे ...

संचारबंदी काळात छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी
भुयार : मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता सरकारने कोरोना नियंत्रित व्हावा यासाठी संचारबंदी घोषित केली. त्यामुळे गरिबाचे हक्काचे काम ,गावातील पानटपर्या, शेतकऱ्यांचा रोजगार, परिसरातील मिर्ची सातरे, न्हावीचे व्यवसाय व छोटे मोठे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट निर्माण झाले.
यामुळे गावातील रोजगार बंद झाल्याने जनतेसमोर आर्थिक संकट निर्माण झाला .या गरीब कामगार व या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत म्हणून दोन ते तीन हजार रुपये द्यावे व कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन जनजागृती करतात त्यासाठी त्यांना ५० लाखांचा विमा तसेच सेफ्टी किट देण्याची मागणी येथून जवळच असलेल्या साठगाव येथील सरपंच प्रीती दिडमुठे यांनी चिमूरचे तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.