अखेर बावनथडी प्रकल्पाचे पाणी जलाशयात सोडले

By Admin | Updated: April 28, 2017 00:33 IST2017-04-28T00:33:35+5:302017-04-28T00:33:35+5:30

बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर ....

Finally, the water of the Baavanathi project was left in the reservoir | अखेर बावनथडी प्रकल्पाचे पाणी जलाशयात सोडले

अखेर बावनथडी प्रकल्पाचे पाणी जलाशयात सोडले

शेतकऱ्यांमध्ये आनंद: चरण वाघमारे यांची मध्यस्थी, शिवसेनेनेही केले होते पाण्यासाठी आंदोलन
पवनारा : बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी मध्यस्थी केल्यानंतर २७ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता बावणथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यात आले आहे.
तुमसर तालुक्यातील बघेडा व कारली जलाशयात पाण्याचा तुटवडा पडल्यामुळे जलाशयांतर्गत १५०० एकरातील धान पीक करपण्याच्या मार्गावर होते. यासंदर्भात बावनथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्याविषयी डॉ.हरेंद्र रहांगडाले यांच्या नेतृत्वात संदीप टाले, मुन्ना पुंडे, सदन चौधरी, रतन पारधी, दीनदयाल बिसने, अशोक ठाकूर, गोपीचंद गायकवाड अन्य शेतकरी सहभागी होऊन बुधवारला धरणे आंदोलन केले. संबंधित विभागाचे अधिकारी राठोड यांनी आंदोलनकर्त्याला बावनथडीचे पाणी सोडण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. परंतु रात्रीपर्यंत पाणी सोडण्यात आले नव्हते.
आ.चरण वाघमारे यांनी डॉ.हरेंद्र रहांगडाले यांच्या शेतकऱ्यांच्या हिताचा नेतृत्वाला गंभीरतेने घेऊन मध्यस्थी केली. त्यांनतर ताबडतोब सबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून बावनथडीच्या पाण्याची समस्या दूर केली. गुरूवारला सकाळी ९.३० वाजता बावणथडीचे पाणी बघेडा व कारली जलाशयात सोडण्यात आले.
आ. वाघमारे यांनी धरणावर जाऊन आपल्या समक्ष पाणी सोडून घेतले. यावेळी जिल्हा परीषद सदस्य संदीप टाले, पंचायत समिती सदस्य मुन्ना पुंडे, गुरुदेव भोंडे, तहसीलदार गजेंद्र बालपांडे, नायब तहसीलदार निलेश गौड, उपविभागीय अभियंता बावणथडी राठोड, ठाणेदार गोबरवाही किशोर झोटिंग, सरपंच बघेडा वसंत तरटे, प्रकाश दुर्गे, नामदेव चौधरी, अशोक उईके, अशोक ठाकूर, दीनदयाल बिसने, राजेंद्र रहांगडाले, गोपीचंद गायकवाड, यशपाल गौपाले, हेमंत चंद्रिकापुरे, रामदास नगरे, निखिल पटले, दुर्गेश हाडगे, नरेश पेंदाम, फुलचंद गौपाले, रमेश बिसने, मनोज ठाकरे उपस्थित होते.
दरम्यान बावनथडीचे पाणी सिंचनासाठी शेतकऱ्यांना देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्त्वात २१ एप्रिल रोजी तुमसरात अधिकाऱ्यांना घेराव करण्यात आले होते. बुधवारला याच मागणीसाठी चिचोली फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा शहर प्रमुख सुर्यकांत ईलमे उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Finally, the water of the Baavanathi project was left in the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.