शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महायुतीचे उमेदवार ठरले; भंडाऱ्यात भोडेकर, तुमसरात कारेमोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 13:10 IST

महायुतीकडून साकोलीची घोषणा नाही : महाआघाडीत घोषणेची प्रतिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : अखेर भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदार संघात महायुतीने उमेदवारांची घोषणा केली आहे. भंडारा विधानसभेसाठी शिवसेना (शिंदे गट) उमेदवार म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भंडारा विधानसभा क्षेत्रात महायुतीमध्ये उमेदवारीवरून भाजपा आणि शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून बरीच स्पर्धा सुरू होती. तिकीटाच्या लढाईत भोंडेकर यांनी बाजी मारली. मंगळवारी रात्री उशिरा पक्षाकडून जाहीर झालेल्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला. 

तुमसरमध्ये गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे नेते अजीत पवार यांनी घेतलेल्या मेळाव्यातून राजू कारेमोरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. एवढेच नाही तर, कामाला लागण्याचे स्पष्ट आदेशही भाषणातून दिले होते आता उमेदवारी जाहीर झाल्याने या दोन्ही मतदारसंघातील वाद थांबला आहे. 

महाआघाडीत तिकीटावरून प्रचंड वाद ?महाआघाडीमध्ये जिल्ह्यातील एकाही मतदार संघात उमेदवारी जाहीर झालेली नाही. भंडाऱ्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात तिकीटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. काँग्रेसकडून पुढे आलेल्या नावाला प्रत्यक्ष घरातूनच प्रचंड विरोध सुरु झाला आहे. तुमसर क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. संभाव्य उमेदवार असलेले चरण वाघमारे यांच्याविरोधात महाआघाडीतील स्थानिक नेत्यांनीच जोरदार आघाडी उघडली आहे. साकोलीचे तिकीट नाना पटोले यांच्यासाठी पक्के मानले जात असले तरी घोषणा बाकी आहे. 

आता प्रतिक्षा साकोलीची महायुतीने दोन जागी उमेदवार जाहीर केले असले तरी आता साकोलीची घोषणा बाकी आहे. या मतदार संघात भाजपऐवजी राष्ट्रवादीला तिकीट देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याविरोधात स्थानिक भाजप नेत्यांनी जोरदार आघाडी उघडली आहे. हा वाद आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचल्याने येथील उमेदवारीची घोषणा लांबणीवर पडल्याची माहिती आहे

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४tumsar-acतुमसरbhandara-acभंडाराElectionनिवडणूक 2024