अखेर ‘तिने’ आयुष्याचा गाठला अंत
By Admin | Updated: February 22, 2016 01:03 IST2016-02-22T01:03:14+5:302016-02-22T01:03:14+5:30
कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले.

अखेर ‘तिने’ आयुष्याचा गाठला अंत
अन्नावाचून मृत्यू : युवकाने स्वीकारले पालकत्व
लाखांदूर : कित्येक दिवसांपासून भूकेने व्याकुळे जीवाला सरपटत नेणाऱ्या वृध्देला आधार मिळाला. पुरेशे अन्न, वस्त्र देतांना संबंधित आधारकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र तब्बल २२ दिवस उपचारार्थ दाखल या महिलेचा वार्धक्याने त्रस्त शरीराने दगा दिला अन् तिने आयुष्याचा अंत गाठला. शारदा बहू शहारे (८०) असे या वृध्देचे नाव. अन्नवाचून वार्धक्याने ग्रस्त जीव पेलवितांना या वृध्देकडून अनेकांना अन्नासाठी हाक दिली जात होती.
लाखांदूर येथील टी-पाईन्ट या वर्दळीच्या मुख्य चौकात उघड््यावर सरपटत संचार करतांना अनेकांकडून कधी मतीमंद, मनोरुग्ण तर कधी वेंधळेपणाने व्यंगत्वपूर्ण जीणे पाहून घृणास्पद वागणुक दिल्या गेले.
सामाजिक व मानवी संवदेना जागृत होण्याहेतूचे वृत्त प्रकाशित होताच सामाजिक दायित्वाच्या भावनेने ओभंबलेल्या येथील युवा शेतकऱ्यांनी तिचे पालकत्व स्विकारले. अनेक दिव्यांपासून उघड्यावर संचार करतांनाच अन्नावाचून शरिराला आलेल्या व्यंगत्वाची दखल घेत पुरेसे अन्न व नवीन वस्त्र देवून थकलेल्या या जीवाला ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. वयाची ८० वर्षे गाठलेल्या या वार्धक्यपूर्ण जीवाला आयुष्याच्या अंताकडे वाटचाल करतांना युवा शेतकऱ्यांच्या रुपात आधारवड मिळाला.
मात्र कित्येक दिवसांपासून अन्नावाचून थकलेल्या शरीरिला पुरेसे अन्न-वस्त्र मिळूनही वार्धक्याने ग्रस्त या वृध्देने २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान जीव सोडला. मृत्यूची बातमी कळताच संबंध युवा शेतकऱ्यांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. यावेळी संबंधितांनी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या संमतीनुसार सामाजिक रितीरिवाजानुसार २१ फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार केले. पुरेसे अन्न, वस्त्र व औषधोपचार होवूनही वार्धक्याने ग्रस्त व्यंगत्वाने सरपटणाऱ्या या जीवाने अखेर आयुष्याचा अंत गाठला. (तालुका प्रतिनिधी)