अखेर आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:56 AM2018-09-14T00:56:27+5:302018-09-14T00:57:23+5:30

बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत.

Finally, the police checkpost started on the inter-state border | अखेर आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

अखेर आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

Next
ठळक मुद्देरिक्त पदांमुळे पोलिसांचा ताण वाढलाय: चौकीला गावे हस्तांतरित होणार, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत.
सिहोरा पोलीस ठाणेपासून बपेरा आंतरराज्यीय सिमा १८ किमी अंतरावर आहे. या सिमेवरुन जिल्ह्यात अवैध साहित्यांची आयात व निर्यात करण्यात येत आहे. यामुळे या सिमेवर कायमस्वरुपी पोलीस चौकी मंजुर करण्याची जुनी ओरड आहे. बपेरा आंतरराज्यांचे सिमेवर नेण्याने पोलीस चौकीचे प्रस्तावाला याआधी मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस चौकीचे इमारत बांधकाम करण्यासाठी देवसर्रा गावाचे हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने मध्यंतरी १० लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली असल्याची चर्चा होती. या इमारत बांधकामाचे हस्तांतरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आले आहे. परंतु जागेचा वाद आणि निधीचा वानवा असल्याने पक्के इमारत बांधकाम सुरु करण्यात आले नाही. पोलीस चौकी इमारत जागेची वारंवार पाहणी करण्यात येत आहे. परंतु मुहूर्त सापडेना असे झाले आहे. दरवर्षी सिमेवर राहून चौकी तयार करण्यात येत आहे.
ही सेवा बजावितांना पोलीसांची वाताहत होत असल्याचे जिल्हा पोलीस विभागाने खाजगी घरात आंतरराज्यीय सीमेवर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पोलीस चौकीला मंजुरी दिली. बुधवारला जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांचे हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराज्यीय सिमेलगत असणारे २० गावे या चौकीला हस्तांतरीत केली जाणार आहे. यामुळे सिहोरा गावाचे लांब पल्ल्याचे अंतर गाठण्याने या चौकीत पोलीसांची नियुक्त्या सिहोरा पोलीस ठाणेमधून केली जाणार आहे.
पोलीस ठाण्यात रिक्त पदाची वानवा असल्याने पोलीसांना माथापच्ची करण्याची वेळ येणार आहे. पोलीस ठाण्यात ५३ पदे असतांना २५ पोलीस कार्यरत आहेत. यात १०-१२ पोलीस नियमित वैद्यकीय रजा, बाहेर सेवा, न्यायालय, आठवडी रजा यात गुंतली आहे. कार्यालयात ५ ते ६ पोलीस कार्यरत असतांना बिट मध्ये तपास आणि कार्य करणारी पोलीस नाहीत. या शिवाय महसूल विभागाची कामे त्यांचे मानगुटीवर असतांना वाढता तनाव आहे. अर्धे अधिक पोलीस तनावात काम करीत आहेत. रिक्त पदामुळे अतिरिक्त कामाचा त्याच कार्यरत कर्मचाºयांना देण्यात आलेला आहे. पोलीस चौकीत २४ तास पोलीस नियुक्त कार्यरत राहणार असल्याने रिक्त पदे भरण्याची गरज आहे.

सिहोºयात पोलीसांची वसाहत होणार
सिहोºयात विविध विभागाचे शासकीय कार्यालय आहेत. या कार्यालयात कोट्यवधी रुपये खर्चून कर्मचाºयांचे वसाहत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाºयांना वसाहत नाही. पोलीस ठाण्याचे हद्दीत जागा असतांना वसाहत बांधकामाची ओरड आहे. यामुळे पोलीसांची वास्तव्याची समस्या सुटणार आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी वसाहत बांधकाम मंजुर करण्याकरिता हालचालींना वेग देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सिहोºयात जातीय सलोखा व सद्भावना बैठक
सिहोरा पोलीसठाण्याच्या प्रागंणात जातीय सलोखा आणि सद्भावना बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, माजी सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य गाढवे, पोलीस निरिक्षक प्रमोद बानबेले, मसरके उपस्थित होते. आयोजित बैठकीत गणेश चतुर्थीपासून अनेक सण साजरे केली जाणार आहे. या सणात जातीय सलोखा कायम सदभावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या शिवाय कायम सद्भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या शिवाय डिजे व मोपचे आवाजात समरता ठेवण्याचे सुचना करण्यात आल्या असून मडळांची नोंद करण्याचे माहिती देण्यात आली. संचालन राहुल डोंगरे यांनी तर, आभार प्रदर्शन प्रविण जाधव यांनी केले.

Web Title: Finally, the police checkpost started on the inter-state border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस