अखेर अधिकाऱ्यांनी पुरविल्या खेळाडूंना सुविधा
By Admin | Updated: September 17, 2014 23:35 IST2014-09-17T23:35:31+5:302014-09-17T23:35:31+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त आज दि. १७ ला प्रकाशित झाले.

अखेर अधिकाऱ्यांनी पुरविल्या खेळाडूंना सुविधा
भंडारा : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात शालेय क्रीडा स्पर्धा सुरू आहे. यात सुविधांचा अभाव असल्याचे वृत्त आज दि. १७ ला प्रकाशित झाले. त्यानंतर क्रीडा विभाग खळबळ जागे झाले. जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी स्वत: दखल घेऊन क्रीडांगणाची पाहणी करून खेळाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे आदेश दिले व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात मंगळवार व बुधवारी करण्यात आले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १४, १७ व १९ वयोगटातील शालेय मुली व मुलांच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या. मात्र पावसाळयाचे दिवस असल्याने जनावरांच्या पायांची खुरे मैदानात स्पष्ट दिसून येत असतानाही तिथे माखण माती न टाकता स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडा विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे खेळाडू तिथे पडून त्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व खेळाडूंना शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांना हॉटेलमधून पाण्याची बॉटल विकत घेऊन घ्याव्या लागल्या.
या आशयाचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रकाशित झाले होते. यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा कारभार उघडकीस आला होता. त्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. आज दि. १७ ला मुलींचे सामने होते. सामने सुरू होण्यापूर्वी कर्मचाऱ्यांनी मैदानावरील दुरवस्था दुर करण्याचा प्रयत्न केला. कबड्डीच्या मैदानावर असलेले खड्डे बुजविण्यासाठी त्यावर प्रथम पाणी मारण्यात आले व जनावरांची खुरे असलेला भाग दाबण्यात आला. यासोबतच शुध्द पिण्याचे पाणी खेळाडूंना उपलब्ध करून देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)