अखेर २३ लक्ष रूपये मंजूर
By Admin | Updated: September 24, 2014 23:25 IST2014-09-24T23:25:20+5:302014-09-24T23:25:20+5:30
विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिण्याचे

अखेर २३ लक्ष रूपये मंजूर
दखल : विज्युटाच्या आंदोलनाला यश
भंडारा : विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनने जिल्ह्यातील १२ मान्यताप्राप्त खासगी अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे फेब्रुवारी २०१२ व आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ या महिण्याचे २२ लाख ९२ हजार ६१ रूपये थकित असून ते महिनाभरात न मिळाल्यास दि.१० आॅगस्ट २०१४ च्या लोकमत मधून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्या इशाऱ्याचा दणका म्हणून २३ लाख रूपये मंजूर झाले असून लवकरच शिक्षकांच्या खात्यात जमा होणार आहेत.
फेब्रुवारी २०१२ या महिन्याचे वेतन न मिळालेल्या एकूण १२ कनिष्ठ महाविद्यालय आहेत. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्यू कॉलेज, लाखांदूर, शारदा ज्यु. कॉलेज तुमसर, सुदामा ज्यू. कॉलेज मोहाडी, ग्रामविकास ज्यू. कॉलेज हरदोली, सर्वांगिण शिक्षण ज्यू. कॉलेज पिंडकेपार, नवनीत ज्यू. कॉलेज खमारी, मार्तंडराव कापगते ज्यू. कॉलेज जांभळी सडक, मॉडर्न ज्यू. कॉलेज सातोना, महात्मा गांधी ज्यू. कॉलेज पहेला, महाराष्ट्र ज्यू. कॉलेज सिहोरा, शशिकांत पैठणकर ज्यू. कॉलेज बारव्हा, गंगाराम ज्यू. कॉलेज मासळ या बारा कॉलेजमधील शिक्षकाचे एकूण ४ लाख ३८ हजार १९६ रूपयाचे वेतन शासनाने अडवून ठेवलेले होते.
आॅक्टोबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ पर्यंतचे वेतन थांबलेल्यामध्ये सुदामा ज्यू. कॉलेज मोहाडी, आरएसजीके ज्यू कॉलेज तुमसर, ग्रामविकास ज्यू. कॉलेज हरदोली, मार्तंडराव कापगते ज्यू. कॉलेज जांभळी सडक, सर्वांगिण ज्यू. कॉलेज पिंडकेपार, शशिकांत पैठणकर ज्यू. कॉलेज बारव्हा, चैतन्य ज्यू. कॉलेज बाम्पेवाडा एकोडी या सात ज्यू. कॉलेज शिक्षकांचे एकूण १८ लाख ५३ हजार ८६५ रूपयाचे वेतन शासनाकडे थकित आहेत. त्यामुळे विज्युक्टाने आंदोलनाचा इशारा दिला होता. सदर थकित वेतन लवकर शिक्षकांच्या खात्यात जमा होणार असे विज्युटाचे जिल्हा अध्यक्ष प्रा. मार्तंड गायधने व सचिव प्रा. राजेंद्र दोनाडकर यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)