अखेर मंजूर वीज रोहित्र जोडणीला सुरुवात
By Admin | Updated: January 25, 2016 00:40 IST2016-01-25T00:40:23+5:302016-01-25T00:40:23+5:30
दिघोरीतील मंजूर वीज रोहित्र केव्हा लागणार? अशा आशयाचे वृत्त २१ जानेवारीला लोकमतमध्ये प्रकाशित होताच ..

अखेर मंजूर वीज रोहित्र जोडणीला सुरुवात
दिघोरी/ मोठी : दिघोरीतील मंजूर वीज रोहित्र केव्हा लागणार? अशा आशयाचे वृत्त २१ जानेवारीला लोकमतमध्ये प्रकाशित होताच डोंगरगाव वीज उपकेंद्र व साकोली वीज कार्यालयातील अधिकारी खळबळून जागे झाले. २४ जानेवारीपासून नविन विज रोहित्र मांडण्याच्या हेतूने खांब व तारांची जोडणी सुरु केली.
दिघोरी गावातील शेतकऱ्यांनी शेतीला सिंचनाची कायमस्वरुपी सोय व्हावी व पाण्याअभावी पिके नष्ट होऊ नये यासाठी लाखो रुपये खर्चून शेतामध्ये बोरवेल, विहिरी व फिल्टरची कामे केली. शेती तसेच जवाहर रोजगार योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांनी आपले शेतावर विहिरी तयार केल्या. विहिरी, बोरवेल व फिल्टर शेतात तयार करुन १२ महिनेच्या वर कालावधी लोटला तसेच विज कनेक्शनसाठी डिमांड भरुन ६ महिने लोटले असले तरी अजूनपर्यंत वीज मंडळाद्वारे शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यात आले नव्हते. विज कनेक्शन लवकर मिळावे यासाठी येथील शेतकऱ्यांनी विज कार्यालयाचे उंबरठे झिजविले मात्र त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यापलिकडे या कार्यालयाने काहीच केले नाही. अशातच दोन ट्रान्सफार्मर हे ओव्हरलोड असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोटारपंप जळाले. या सर्व बाबींचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला.
यामुळे लोकमत ने शेतकऱ्यांची समस्या जाणून सलग ३ ते ४ बातम्या प्रकाशित करुन या प्रकरणाला वाचा फोडली. हा विज मंडळ नविन रोहीत्र व कनेक्शन शेतकऱ्यांना देण्याच्या कामाला लागले. शेतकऱ्यांना केलेल्या सहकार्याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आभार मानले. (वार्ताहर)