अखेर २५०० पैकी १३०० रूपये लाभार्थ्यांना परत

By Admin | Updated: July 22, 2016 00:51 IST2016-07-22T00:51:33+5:302016-07-22T00:51:33+5:30

दोन गटात तीन महिने वादविवाद चालल्यानंतर अखेर खडकी येथे वनसमितीच्या माध्यमातून अंदाजे १५५ ग्रामवासीयांना ...

Finally, 2,500 out of 2500 beneficiaries returned | अखेर २५०० पैकी १३०० रूपये लाभार्थ्यांना परत

अखेर २५०० पैकी १३०० रूपये लाभार्थ्यांना परत

तीन महिन्यानंतर वाटप : अतिरिक्त रक्कम वादाचे कारण, खडकीतील गॅस कनेक्शनचे प्रकरण
करडी (पालोरा) : दोन गटात तीन महिने वादविवाद चालल्यानंतर अखेर खडकी येथे वनसमितीच्या माध्यमातून अंदाजे १५५ ग्रामवासीयांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले. उर्वरित रक्कमही परत करण्यात आली.
वाद राहू नये यासाठी लाभार्थ्यांना सिलेंडर वाटप करतेवेळी सिलेंडर बरोबर २,५०० रूपयांपैकी भंडारा येथील गॅस एजंसीने १,२०५ रूपये स्वत:कडे जमा केले. उर्वरित १,३०० रूपये लाभर्थ्यांना परत केले. त्यापैकी ९५ रूपये स्वत: लाभार्थ्यांनी वन समितीकडे इतर कामांसाठी दिले. प्रकरणी दिड लाखांच्यावर अतिरिक्त जमा झालेल्या रक्कमेसाठीच वादविवाद झाल्याने शेवटी लाभार्थ्यांचे भले झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
खडकीत वन परिस्थिती समितीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर वाटपाचा ठराव ग्रामसभेत व समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भंडारा गॅस एजंसीला लोकवर्गणीचे सुमारे ३.७४ लाख रूपये जमा करण्यात आले.
गॅसचे वाटप होणार अशातच काहींनी भंडारा गॅस एजंसी ऐवजी करडीतून गॅस कनेक्शन घेण्यचा विषय मांडला. करडी एजंसीतून कनेक्शन घ्यायचेच होते तर तसा ठराव अगोदरच समिती व ग्रामसभेच्या ठरावावेळी का सुचविण्यात आली नाही, पैसे भरून झाल्यानंतर वाद करण्यात अर्थ नाही, पैसे परत कोण आणणार, त्यामुळे वादविवाद वाढत गेला. तीन महिन्यापासून गॅसचे वाटप रखडल्याने गावकरी संतप्त होते.
या योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनच्या एकूण रक्कमेपैकी २५ टक्के रक्कम लाभार्थ्यांना भरायची होती. गॅस कनेक्शनची किंमत ४,८२० रूपये असल्याने २५ टक्के रक्कम म्हणजे १,२०५ रूपये गॅस एजंसीला लोकवर्गणीच्या रूपात भरायची होती. मात्र वन समितीने लाभार्थ्यांकडून २,५०० रूपये घेतले. सदर रक्कम समितीने रितसर गॅस एजंसीला जमा करून त्याची पावतीही सोबत आणली.
यातील घोळ लक्षात आल्याने दुसऱ्या गटाने भंडारा ऐवजी करडीतून कनेक्शन घेण्यासाठी दबाव वाढविला. त्या अगोदर कुणीही करडीचे नाव घेतले नव्हते, हे विशेष. तीन महिन्यांपर्यंत अनेक खटाटोप केल्यानंतर शेवटी भंडारा येथून कनेक्शन घेण्याला मान्यता देण्यात आली. तुमसर वनाधिकाऱ्यांनी समझोता झाल्याने शासन निधी भंडारा एजंसीला जमा केला. १५ जुलै रोजी गावात गॅस सिलेंडर घेवून गाडी पोहचताच संपूर्ण गावात फटाक्यांची आतिषबाजी एका गटाने केली. त्यामुळे गावात वादळी चर्चा होती.
आणखी वादाची पाश्वभूमी राहू नये, म्हणून लाभार्थ्याकडून लोकवर्गणीच्या रूपात घेतलेले २,५०० रूपयांपैकी १,३०० रूपये लाभार्थ्यांना परत करण्यात आले. वाटप करतेवेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत कमेटी व वनपरिस्थितीकी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Finally, 2,500 out of 2500 beneficiaries returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.