लाखांदूर तहसीलदाराचे रिक्त पद तात्काळ भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:17+5:302021-07-21T04:24:17+5:30
लाखांदूर : तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांचे पद भरले जाते. मात्र, लाखांदूर तालुक्यातील ...

लाखांदूर तहसीलदाराचे रिक्त पद तात्काळ भरा
लाखांदूर : तालुक्यातील नागरिकांच्या विविध शासकीय योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारांचे पद भरले जाते. मात्र, लाखांदूर तालुक्यातील तहसीलदाराचे पद मागील फेब्रुवारी महिन्यापासून रिक्त असून, त्याचा प्रभार येथीलच एका नायब तहसीलदाराकडे दिला असतानादेखील तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय लाभांसाठी तहसीलमध्ये त्रास सहन करावा लागत असल्याने, येथील तहसीलदारांचे रिक्त असलेले पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन गत १८ जुलै रोजी येथील तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तसेच भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
प्राप्त निवेदनानुसार, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांचा महसूल व प्रशासनिक कामकाज सांभाळण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या तहसील कार्यालयांतर्गत तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व प्रशासनिक सुविधा सोडविण्याहेतू, तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ मिळण्याहेतू तहसीलदार, नायब तहसीलदार व तलाठ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. त्यानुसार लाखांदूर तहसील कार्यालयात एक तहसीलदार व नायब तहसीलदारांची दोन पदे मंजूर करण्यात आली आहेत.
दरम्यान, गत फेब्रुवारी महिन्यात येथील तहसीलदार निवृती उईके यांचे स्थानांतरण जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्याने त्यांचे पद रिक्त असून, त्यांचा प्रभार येथीलच एका नायब तहसीलदारांकडे देण्यात आला आहे. संबंधित नायब तहसीलदारांना स्वतःच्या कामाव्यतिरिक्त तहसीलदारांच्या कामाचे अतिरिक्त प्रभार देण्यात आल्याने काम करण्यात खोळंबा होत असल्याचेदेखील निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्याहेतू येथील तहसील कार्यलयात रिक्त असलेले तहसीलदाराचे पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदनातून केली आहे.