शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

‘ड्रोन’च्या माध्यमातून नदीपात्रात चित्रीकरण

By admin | Published: February 13, 2017 12:19 AM

सैराट मराठी चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे मागील चार दिवसांपासून सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान वैनगंगा नदी पात्रात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत.

ढोरवाड्यातही कलाकारांचा ठिय्या : सैराट निर्माते नागराज मंजुळे यांची उपस्थिती मोहन भोयर तुमसरसैराट मराठी चित्रपटाचे निर्माते नागराज मंजुळे मागील चार दिवसांपासून सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान वैनगंगा नदी पात्रात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करीत आहेत. ड्रोणच्या माध्यमातून येथे चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात त्यांची पाटलांची मुख्य भूमिका आहे. शनिवारी दिवसभर नदी पात्रातील पाण्यातून बैलगाडी एका तिरावरुन दुसऱ्या तिरावर काठावर बाहेर काढण्याचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रीकरणादरम्यान युनिट सदस्याव्यतिरिक्त दुसऱ्यांना तिथे जाण्याची मनाई आहे, हे विशेष.पूर्व विदर्भातील वैनगंगा ही प्रमुख नदी आहे. सुकळी (दे) व मुंढरी दरम्यान नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. एका काठावरुन दुसऱ्या काठावर जाण्यास येथे पूल नाही. दोन गावांचा संपर्क पावसाळ्यात बंद असतो. ऐरवी हिवाळा व उन्हाळ्यात नदी पात्रातून ये-जा सुरु असते. जीव धोक्यात घालून हे येथे सुरु आहे. यासंदर्भात या चित्रपटात येथील दृष्य घेण्यात आले आहे. आतापर्यंत माडगी (दे.) येथील सीबीएससीची एस.एन.एस. शाळेबाहेरील दृष्य चित्रीकरण करण्यात आले. यात एका पाच वर्षीय मुलीला तिचे वडील शाळेत सोडून देत आहेत. दुसरे दृष्य रुग्णालयताील आहे. तुमसर तालुक्यातील ढोरवाडा (दे) येथे चित्रपटाचा सेट (वाडा) तयार केला आहे. या चित्रपटातील अनेक दृष्य वैनगंगा नदी पात्रातील आहेत.नदी पात्रात चार कोळ्यांच्या झोपड्या तयार केल्या आहेत. त्यात मासेमारीचे जाळे ठेवले आहेत. वाहत्या पाण्यातून बैलबंडीची वाहतूक हे मुख्य दृष्य येथे शनिवारी दिवसभर चित्रीकरण करण्यात आले. या दृष्यात खुद्द नागराज मंजूळे बैलबंडीला ढकलत आहेत. बैलबंडीवर एक वृध्द महिला, पाच ते सहा वर्षाचा एक मूलगा, बैलबंडी हाकणारा एक युवक असे हे दृष्य आहे.चित्रपटाचे नाव नाळ, आई तथा सैराट २ असल्याची चर्चा आहे. खरे नाव येथे गुपीत ठेवण्यात आले आहे. मुंढरी येथील एका मंदिरात येत्या दोन- तीन दिवसात चित्रीकरण करण्यात येईल असे युनिट सदस्यांनी सांगितले. डिसेंबर अखेर पर्यंत हा चित्रपट प्रदर्शनीत होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात काही स्थानिक कलावंत घेण्यात आले आहे. स्थानिकांना येथे यामुळे रोजगारही प्राप्त झाला आहे. चित्रीकरणादरम्यान कुणालाच जवळ जाण्याची येथे मनाई आहे. युनिटमध्ये किमान ६० ते ७० जणांचा समावेश आहे.या चित्रपटात नागराज मंजूळे हे पाटलाच्या मुख्य भूमिका साकारीत ओत. पूर्व विदर्भातील बोली भाषा, आर्थिक, सामाजिक स्थिती, समस्या, अडचणी, एकोपा-दुरावा, स्थानिक लोक यांचे मिश्रण या चित्रपटात आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेकडो नागरिक चित्रीकरणाला उपस्थिती दर्शवित आहेत.