सात आरोपींविरूद्ध ८00 पानांचे आरोपपत्र दाखल

By Admin | Updated: May 27, 2014 23:27 IST2014-05-27T23:27:50+5:302014-05-27T23:27:50+5:30

येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींविरूद्ध आज मंगळवारीे दुपारी २ वाजता पोलिसांनी तुमसर न्यायालयात ८00 पानांचे

Filing an 800-page charge sheet against seven accused | सात आरोपींविरूद्ध ८00 पानांचे आरोपपत्र दाखल

सात आरोपींविरूद्ध ८00 पानांचे आरोपपत्र दाखल

प्रकरण सराफा व्यापार्‍याच्या खुनाचे : आरोपींना तुमसर न्यायालयात हजर करणार

तुमसर : येथील सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा) त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींविरूद्ध आज मंगळवारीे दुपारी २ वाजता पोलिसांनी तुमसर न्यायालयात ८00 पानांचे आरोपत्र दाखल केले. बुधवारला, (दि.२८) सातही आरोपींना तुमसर न्यायालयात हजर करणार आहेत. हे बहुचर्चित तिहेरी हत्याकांड राज्यभरात गाजले होते.

दि.२६ फेब्रुवारीच्या मध्यरात्री येथील प्रख्यात सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल या तिघांची सात दरोडेखोरांनी हत्या केली होती. हत्याकांडातील शाहनवाज ऊर्फ बाबु सत्तार शेख (२२) रा.तुमसर, महेश आगाशे (२६) रा.तुमसर, सलीम नजीर खान पठाण (२४) रा.तुमसर, राहुल पडोळे (२२) रा.तुमसर, सोहेल शेख (२६) रा.नागपूर, केसरी ढोले (२२) रा.तुमसर, रफीक शेख (४२) रा.नागपूर या आरोपींना तुमसर पोलिसांनी २४ तासात अटक केली होती.

२७ फेब्रुवारी रोजी आरोपीविरूद्ध भादंवि ३0२ खून करणे, ३९६ खुनासह दरोडा, ४४९ मृत्यूच्या शिक्षेचा गुन्हा करण्याकरीता गृहप्रवेश, १२0 फौजदारी कट रचणे व २0१ पुरावे नष्ट करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केसरी ढोले, महेश आगाशे व सोहेल शेख यांच्याविरुद्ध या गुन्ह्याशिवाय २0१ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

तुमसर पोलिसांनी या दरोडा प्रकरणात ३९ लाख ५ हजार रोख, ८.३९४ किलोग्रॅम सोने किंमत १ कोटी ६५ लक्ष, चांदी ८४२ ग्रॅम किंमत १९ हजार ५00, दोन दुचाकी ७0 हजार असे एकूण २ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला होता. आरोपीकडे पुन्हा मुद्देमाल असण्याची शक्यता उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे यांनी वर्तविली आहे. या प्रकरणात फाशीची शिक्षेची कलमे आहेत. हे प्रकरण जलद न्यायालयात असून तीन महिन्यानंतर ट्रायल सुरू होण्याची शक्यता आहे. दि.२८ रोजी सातही आरोपींना आरोप पत्रांची स्वतंत्र प्रत दिली जाणार आहे. हत्याकांडाची भीषणता लक्षात घेऊन गृह मंत्रालयाने या प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे.

काय आहे आरोपपत्रात

तुमसर येथील सराफा व्यापारी संजय सोनी, पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांची गळा आवळून सात दरोडेखोरांनी निर्घृण हत्या केली. दि.२६ फेब्रुवारी संजय सोनी हे शाहनवाज सत्तार शेख या वाहन चालकासोबत गोंदिया येथे व्यवसायानिमित्त गेले होते. रात्री परतीच्यावेळी तिरोडाजवळील विहीरगाव शिवारात चालकाने कार थांबविली. तिथे सहा आरोपी दुचाकी घेऊन वाट पाहत होते. कारचा इंडीकेटर दाखविताच ते धावत येऊन कारमध्येच संजय सोनी यांचा गळा आवळून खून केला.

त्यानंतर संजयचा मृतदेह घेऊन हे सात आरोपी त्यांच्या घरी आले. घरी उर्वरित रक्कम व सोने जमा करुन या दरोडेखोरांनी संजय यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल या दोघांचाही गळा आवळून खून केला. कारसह दुचाकी घेऊन सातही आरोपी गायमुखच्या दिशेने फरार झाले. पोलीस मागावर असतील, या भीतीमुळे ते माघारी हसाराटोली व काटेबाम्हणी येथे शिवारात पोहोचले. काटेबाम्हणी येथील शेतात सोने व रोख रकमेचे वाटप केले. चार आरोपी तुमसर तर तीन आरोपी रामटेक-भंडारा मार्गे नागपूरकडे फरार झाले. आरोपपत्रात ९९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आलेल्या असून पंच, पंचनामे, बयान, ओळख, परेड, रोख, सोने, साहित्य, मोबाईल सीडीआर जप्ती घेण्यात आलेल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Filing an 800-page charge sheet against seven accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.