बांधकामावरून दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST2021-08-20T04:41:04+5:302021-08-20T04:41:04+5:30

कृष्णा बाबुराव माटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या घरासमोरील खुल्या जागेतील बांधकाम पाहण्यासाठी गेले असता तेथे वाद झाला. या ...

Fighting in two groups over construction | बांधकामावरून दोन गटात हाणामारी

बांधकामावरून दोन गटात हाणामारी

कृष्णा बाबुराव माटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते त्यांच्या घरासमोरील खुल्या जागेतील बांधकाम पाहण्यासाठी गेले असता तेथे वाद झाला. या वादात त्यांना सूर्यकांत टिकाराम सेलोकर रा. मांढळ, मनीष पडोळे रा. मोहाडी, शिवलाल सेलोकर रा. मांढळ, लक्ष्मीकांत सेलोकर आणि बंडू बारस्कर रा. मांढळ यांनी लाकडी पाटीने मारहाण केल्याची तक्रार देण्यात आली. त्यावरून या पाच जणांवर गुन्हा दाखल केला. तर सूर्यकांत टिकाराम सेलोकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मालकीच्या प्लाॅटवर कब्जा मिळविण्याचा प्रयत्न करून त्यांना शिवीगाळ केली. यात त्यांना दगड-विटाने मारहाण करण्यात आली. त्यावरून आरोपी कृष्णा बाबुराव माटे, राधाबाई कृष्णा माटे, राजकुमार ग्यानीराम माटे, प्रणय कृष्णा माटे, सहारा कृष्णा माटे, गौरीशंकर सीताराम माटे आणि नाना माणिकराव माटे सर्व राहणार खापा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting in two groups over construction