हत्तीडोई येथे दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:46+5:302021-04-01T04:35:46+5:30
भंडारा : घरासमोरून गायी-म्हशी नेण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील हत्तीडोई येथे घडली. एकमेकांना लोखंडी ...

हत्तीडोई येथे दोन गटांत हाणामारी
भंडारा : घरासमोरून गायी-म्हशी नेण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना भंडारा तालुक्यातील हत्तीडोई येथे घडली. एकमेकांना लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोन्ही गटांच्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा तालुक्यातील हत्तीडोई येथील विलास मधुकर डोळस यांनी दिलेल्या तक्रारीवरून गायीने घरासमोर शेण का केले यावरून गणेश झिटू बांडेबुचे, उमेश झिटू बांडेबुचे, रमेश झिटू बांडेबुचे यांनी लोखंडी साळखीने विलासला मारहाण केली. त्यात तो जखमी झाला, तर गणेश बांडेबुचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मधुकर डोळस, मधुकर यांची पत्नी, विलास मधुकर डोळस, कैलास मधुकर डोळस या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी लोखंडी राॅड व सब्बलने मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.