शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढा उभारु
By Admin | Updated: August 31, 2016 00:30 IST2016-08-31T00:30:09+5:302016-08-31T00:30:09+5:30
जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.

शिक्षकांच्या मागण्यांसाठी लढा उभारु
मुबारक सय्यद यांचे प्रतिपादन : पवनी तालुका संघाची कार्यकारिणी गठित
भंडारा : जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत. त्या मागण्या येत्या काही दिवसात पूर्ण न केल्यास प्रशासनाविरुद्ध लढा उभारू असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले.
आकोट येथील संत मनीराम बाबा मठात आयोजित पवनी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पवनी तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. या बैठकीला प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विकास गायधने, शाखाध्यक्ष संजीव बावनकर, शिक्षण विस्तार अधिकारी के. डी. भुरे, केंद्रप्रमुख विजय भुरे, जी. एन. गायधने, योगेश कुटे, भैय्या देशमुख, रमेश लोणारे, केशर मासूरकर आदी उपस्थित होते. यावेळी सय्यद यांनी उस्मानाबाद येथे पार पडलेल्या सभेत महामंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती उपस्थित शिक्षकांना दिली. दरम्यान उपस्थित विकास गायधने व संजीव बावनकर यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी पवनी तालुकास्तरीय कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात तालुकाध्यक्षपदी हरिदास घावळे, तालुका सरचिटणीसपदी उत्तम कुंभारगावे, कार्याध्यक्षपदी विलास शेंडे, कोषाध्यक्ष प्रकाश दहिवले, शिक्षक नेते उमाजी देशमुख, जिल्हा प्रवक्ता राजेश नागपुरे, डी.सी.पी.एस. राज्य प्रतिनिधी म्हणून मुकुंद घुमे यांची निवड करण्यात आली. या बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य शिक्षिका उपस्थित होत्या. संचालन प्रकाश चाचेरे यांनी केले. तर आभार हरिदास घावडे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)