रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

By Admin | Updated: May 13, 2015 00:51 IST2015-05-13T00:51:00+5:302015-05-13T00:51:00+5:30

शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे.

Fertilizers are expensive due to lack of rack points | रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

रॅक पॉर्इंटअभावी खते महागले

भंडारा : शेतकऱ्यांना रासायनिक खते पुरविण्यासाठी जिल्ह्यात रेल्वेचे रॅकपॉर्इंट उभारण्यावरुन पाच वर्षापासून राजकारण सुरु आहे. मात्र, अद्याप रॅकपॉर्इंट झालेच नाही. त्यामुळे चालू हंगामातही शेतकऱ्यांना निर्धारिक किंमतीपेक्षा अधिक दराने खते खरेदी करण्याची वेळ आली.
उन्हाळ्याची दाहकता जाणवत असून, शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन व मशागतीची तयारी सुरु केली. कृषी विभागाने ८० हजार मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली. त्यापैकी १७ हजार मेट्रिक आवंटनाला मंजुरी मिळाली आहे. जिल्हयात पुरवठा करण्यात येणार एवढ्या मोठ्या प्रमाणात रासायनिक खत कामठी, वडसा किंवा गोंदिया येथील रॅकपॉर्इंटवर येते. त्यानंतर मालवाहू वाहनाद्वारे जिल्ह्यातील विक्रेत्यांपर्यंत वाहतूक केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यापर्यंत खत पोहोचविताना त्यावर होणारा वाहतूक खर्च वाढलेला असतो. याचा परिणाम लहानमोठ्या सर्वच शेतकऱ्यांवर होत असतो. गेल्या पाच वर्षापासून रेल्वेमार्गालगत असलेल्या वरठी, देव्हाडी येथील स्टेशनवर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन रॅकपॉर्इंटच्या दृष्टीने पाहणी केली. राजकीय नेत्यांनी त्यावर मनोगत व्यक्त करुन शेतकऱ्यांच्या हितासाठी लवकरच रॅकपॉर्इंट होणार असल्याचे आश्वासनेही दिली. त्याच्या भरवशावर निवडणुकात प्रचारही केला. परंतु, सत्ताधारी आणि विरोधकापैकी होणीही हा विषय लावून धरला नाही. त्यामुळे जिल्हयात आजही परजिल्हयातील रॅकापॉर्इंटवरुनच रासायनिक खतांची वाहतूक करावी लागत आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना दरवर्षीच सहन करावा लागत आहे.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: Fertilizers are expensive due to lack of rack points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.