लोकमत समूहातर्फे वृत्तपत्र विक्रेत्या पाल्यांचा सत्कार
By Admin | Updated: June 29, 2016 00:41 IST2016-06-29T00:41:07+5:302016-06-29T00:41:07+5:30
‘लोकमत’ समुहाच्यावतीने जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरक व हॉकर्सच्या दहावी व बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या

लोकमत समूहातर्फे वृत्तपत्र विक्रेत्या पाल्यांचा सत्कार
भंडारा : ‘लोकमत’ समुहाच्यावतीने जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरक व हॉकर्सच्या दहावी व बारावीत ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या पाल्यांना लोकमत जिल्हा कार्यालयात सत्कार करण्यात आला.
वृत्तपत्र वितरक संघटनेचे अध्यक्ष किशोर मोरे यांची मुलगी सिद्धी हिला दहावीत ८२ टक्के गुण मिळाले. वृत्तपत्र वितरक कंकर अटराये यांची मुलगी मयुरी हिला दहावीत ८७ टक्के गुण मिळाले. या दोन्ही विद्यार्थ्यांना लोकमत कार्यालयात आमंत्रित करण्यात आले. सिद्धी मोरे ही अभ्यासक्रम प्रवेशासाठी बाहेरगावी असल्यामुळे तिच्या आईवडीलांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या कार्यक्रमात मयुरी अटराये व तिचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांना कार्यालय प्रमुख मोहन धवड यांच्या हस्ते पुष्पगुष्छ व धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, प्रतिनिधी इंद्रपाल कटकवार, नगर प्रतिनिधी देवानंद नंदेश्वर, शहर प्रतिनिधी प्रशांत देसाई, वितरण प्रतिनिधी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, लोकमत समाचारचे दसाराम म्हात्रे, कंकर अटराये, रमेश सेलोकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)