पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षांचा सत्कार

By Admin | Updated: May 2, 2016 00:35 IST2016-05-02T00:35:48+5:302016-05-02T00:35:48+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत तुमसर नगर परिषदेची निवड होवून शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल...

Felicitated the head of the guard at the hands of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षांचा सत्कार

पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षांचा सत्कार

१०० टक्के शहर हागणदारीमुक्त : महाराष्ट्रातील १७ नगरपालिकांपैकी एक
तुमसर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत तुमसर नगर परिषदेची निवड होवून शहर शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याबद्दल आज, १ मे रोजी महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांना मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील २१६ नगरपरिषदेपैकी केवळ १७ नगरपरिषदेची निवड शासनामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे व मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे व त्यांची चमू व सर्व नगरसेवकांनी शहर हागणदारीमुक्त करण्याचा विडा उचलला होता. त्यानुसार शंभर टक्के तुमसर शहराला हागणदारीमुक्त करण्याचा अभियान नगरपरिषदेने यशस्वीरित्या राबविला.
या अभियानाची दखल जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी घेतली. त्यांच्या कार्याचे कौतूक करण्याकरिता पालकमंत्री डॉ.दिपक सावंत यांच्या हस्ते नगराध्यक्ष कारेमोरे व मुख्याधिकारी गुल्हाणे यांना मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
यावेळी नगरसेवक दिपक कठाणे, सलाम तुरक, शोभा लांजेवार, कविता साखरवाडे, मिना गाढवे, चंदा धार्मिक, लक्ष्मीकांत सलामे, आशिष कुकडे, संदीप पेढे, सुनील लांजेवार व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Felicitated the head of the guard at the hands of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.